एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'फटे' नंतर आता 'कट्टे' घोटाळा ; पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने पंढरपुरात अनेकांची फसवणूक 

पंढरपूर येथील प्रथमेश कट्टे हा संकल्प पतसंस्थेचा चेअरमन आहे. आमच्या पतसंस्थेत गुंतवणूक करा, सहा महिन्यात पैसे डबल देतो, असे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

पंढरपूर : बार्शीच्या विशाल फटे घोटाळ्यानंतर आता पंढरपुरातही अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या फसवणुकीबाबत संकल्प पतसंस्थेचा चेअरमन प्रथमेश कट्टे याच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. 

पंढरपूर येथील प्रथमेश कट्टे हा संकल्प पतसंस्थेचा चेअरमन आहे. आमच्या पतसंस्थेत गुंतवणूक करा, सहा महिन्यात पैसे डबल देतो, असे आमिष दाखवले. त्यामुळे त्याच्याकडे पंढरपूरमधील अनेक  प्रतिष्ठित व्यक्तींनी गुंतवणूक केली. परंतु, सहा महिने झाल्यानंतर पैसे देण्यास कट्टे टाळाटाळ करू लागला. त्यामुळे पंढरपूर येथील सुनील भिसे यांनी कट्टे आणि त्याचा साथीदार शुभम खोडके याच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात कट्टे आणि खोडके यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

सुनील भिसे यांनी 9 सप्टेंबर 2019 रोजी संकल्प पथसंस्थेत 15 लाख रूपयांची गुंतवणूक केली. मार्च 2020 मध्ये सहा महिने पूर्ण झाल्यानंतर भिसे यांनी कट्टे याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी कट्टे हा पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे भिसे यांनी कट्टे आणि खोडके यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. 

पंढरपूर शहरात अनेकांची फसवणूक झाल्याचे या प्रकरणातून पुढे येण्याची शक्यता आहे. परंतु, अनेक जण अद्याप तक्रार देण्यास पुढे आले नाहीत. ज्या लोकांनी या पथसंस्थेत पैशांची गुंतवणूक केली आहे, परंतु, पैसे परत मिळाले नाहीत त्यांनी तक्रार द्यावी असे आवाहन पंढरपूर शहर पोलिसांनी केले आहे. 

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात दोन महिन्यात कोट्यवधी रूपयांची फसवणूक होण्याची ही दुसरी घटना आहे. बार्शी येथील विशाल फटे यानेही अनेकांना दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सध्या तो तुरूंगात असून आता ही दुसरी घटना समोर आल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझाMahayuti Oath Ceremony :  5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधीUddhav Thackeray On Mahayuti :विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही-ठाकरेMahadev Jankar Vs Raosaheb Danve : EVM हॅक करता येतं मी स्वत: इंजिनिअर : महादेव जानकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
Embed widget