एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर रेल्वे स्थानक परिसरात आयटीबीपीची 98 काडतुसं मिळाली, 7 जिवंत काडतुसं गायब
लोहमार्ग पोलिसांना तीन बॉक्सेसमध्ये 98 काडतुसं असल्याने या बॉक्सेसमधून 7 काडतुसं गायब झाल्याचे समोर आल्याने आता नवे आव्हान उभे राहिले आहे. लोहमार्ग पोलिसांनी मिळालेल्या 98 काडतुसांबद्दल आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. तर गायब झालेल्या 7 काडतुसांसाठी शोध मोहीम सुरु केली आहे.
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात मिळालेल्या 98 काडतुसं सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र ही काडतुसं आयटीबीपीची (इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स ) असल्याचा निर्वाळा झाला असला तरी या काडतुसांच्या बॉक्समधून 7 काडतुसं गायब असल्याचे समोर आल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
काल संध्याकाळी नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 7 जवळ मेंटेनन्स विभागाच्या सी अँड डब्ल्यू केबिनमध्ये एका कपाटाखाली तीन बॉक्समध्ये जिवंत काडतुसं आढळली होती. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात एकाच खळबळ उडाली होती. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला होता. या तपासात 9 एमएम आकाराची ही काडतुसं कुठल्या तरी सुरक्षा दलाशी संबंधित असावीत असा अंदाज होता.
21 नोव्हेंबर 2018 रोजी आयटीबीपीची एक तुकडी रेल्वेने दक्षिण भारताच्या दिशेने गेली होती. त्यांना सोडून परत नागपूरला आलेल्या त्या रेल्वेच्या सफाई दरम्यान एका बर्थखाली एका लोखंडी पेटीत मोठ्या संख्येने जिवंत काडतुसं सापडली होती. त्यावेळी आयटीपबीपीच्या अधिकाऱ्यांनी नागपुरात येऊन त्यांच्याकडून राहिलेली काडतुसं ताब्यात घेतली होती. त्यांच्या लोखंडी पेटीत 3 बॉक्सेसमध्ये 105 काडतुसं असल्याची आणि यामध्ये 7 काडतुसं कमी असल्याची तक्रार त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे नोंदविली होती.
लोहमार्ग पोलिसांना तीन बॉक्सेसमध्ये 98 काडतुसं असल्याने या बॉक्सेसमधून 7 काडतुसं गायब झाल्याचे समोर आल्याने आता नवे आव्हान उभे राहिले आहे. लोहमार्ग पोलिसांनी मिळालेल्या 98 काडतुसांबद्दल आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. तर गायब झालेल्या 7 काडतुसांसाठी शोध मोहीम सुरु केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
बातम्या
Advertisement