एक्स्प्लोर

नागपुरात हत्यासत्र सुरुच! 11 दिवसांत जिल्ह्यात 11 तर शहरात 8 खून; आज कुख्यात गुंड बाल्या वंजारीची हत्या

नागपुरात खुनाची मालिकाच सुरुच. 11 दिवसात जिल्ह्यात 11 तर नागपूर शहरात 8 खून. आज पारडी परिसरात आठवडी बाजारातील कुख्यात गुंडाची सर्वांच्या देखत हत्या झाली.

नागपूर : शहरात सुरू झालेली हत्यांची मालिका थांबायची चिन्हे नाहीत. कारण गेल्या 11 दिवसात जिल्ह्यात 11 तर नागपूर शहरात 8 खून झालेत. या घटना ताजी असतानाच संध्याकाळी पारडी परिसरातील आठवडी बाजारात एका कुख्यात गुंडाची हत्या झाली आहे. आठवडी बाजारात किरकोळ वादातून पारडी परिसरातला कुख्यात गुन्हेगार बाल्या वंजारीचा खून करण्यात आला. त्यामुळे बाजारात गोंधळ माजला होता. यामुळे नागपूरमध्ये कायद्याचा धाक बिलकून राहिला नसल्याचे आरोप होत आहेत. नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य मार्गावर रविवारी संध्याकाळी आठवडी बाजार भरतो. याच बाजारत कुख्यात गुंड प्रदीप उर्फ बाल्या वंजारीची हत्या करण्यात आली. बाल्याची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली आहे. मृत बाल्या वंजारी हा कुख्यात गुन्हेगार असून पोलिसांनी त्याला नागपूर शहरातून तडीपार देखील केले होते. मृत बाल्या वंजारी गेले काही दिवस परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याचे अनेकांशी वाद वाढले होते. आज पारडी मार्गावरील आठवडी बाजार भरला असताना बाल्या त्याठिकाणी असल्याची माहिती समजताच आरोपी नरेंद्र मेहर याने बाल्याला गाठून धारधार हत्यारांनी त्याची निर्घृण हत्या केली. पूर्ववैमन्यासातून खून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे महिनाभरापूर्वी मृत बाल्या आणि आरोपी नरेंद्र मेहर या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्याच वादाचे रूपांतर बाल्या वंजारीचा हत्येत झाले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नागपुरात खुनाच्या घटनांचे सत्र जवळपास रोजच सुरू आहे. गेल्या 11 दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात खुनाच्या 11 घटना घडल्या आहेत. त्यापैकी 8 घटना एकट्या नागपूर शहरात घडल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात दिव्यांग अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर बळजबरीने गर्भपात नागपूर बनतंय क्राईम कॅपिटल राज्याची उपराजधानी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरात लॉकडाऊन नेमकं जनतेसाठी खुला करण्यात आलाय की गुन्हेगारांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण म्हणजे गेल्या एका आठवड्यात नागपूर शहर आणि जिल्ह्यात घडत असलेल्या गुन्ह्याच्या अत्यंत गंभीर घटना. रस्त्यावर गुन्हेगारांमध्ये टोळीयुद्ध, रस्त्यावर लुटीच्या घटना, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना आणि एकानंतर एक 12 हत्यांच्या घटना घडल्या आहे. अशा अत्यंत गंभीर घटनांनी कोरोनाशी लढणारा नागपूर जिल्हा गुन्हेगारीमुळे रक्तरंजित होताना दिसून येत आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जिल्ह्यातच गुन्हेगारांनी शांतता भंग केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. Mission Begin Again | आजपासून मिशन बिगिन अगेन, मुंबई, नागपूर, नाशिकमध्ये खबरदारी घेत दुकानं सुरु

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget