एक्स्प्लोर

समस्या सांगता येत नाही म्हणून 'त्याने' जयंत पाटील यांच्यासमोर पत्नीला लावला फोन

आपली समस्या मंत्री जयंत पाटील यांना सांगता येत नसल्याने एका तरुणाने त्यांच्यासमोरच आपल्या पत्नीला फोन लावला. जयंत पाटील यांनीही आपल्या हजरजबाबी वृत्तीने त्यांची समस्या जाणून घेतली.

मुंबई : इस्लामपूर येथील रेठरे हरणाक्ष गावच्या हसन हकीम या तरुणाला बोलता येत नाही. मागील वर्षी आलेल्या पुरात त्याचं संपूर्ण घरदार उद्ध्वस्त झालं. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे आपल्या समस्येचे हमखास निवारण होईल या अपेक्षेने हा पाटील यांना भेटण्यासाठी आला. मात्र, त्याला आपल्या समस्या मंत्र्यांकडे मांडाताच येईना. मग तरुणाने शक्कल लढवत जयंत पाटील यांच्या समोरच पत्नीला व्हिडीओ कॉल लावला. जयंत पाटील यांनीही आपल्या हजरजबाबी वृत्तीने समस्या जाणून घेतली आणि समस्येची सोडवणूक करण्यासाठी तत्काळ आदेश दिले. मागील वर्षी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराने थैमान घातलं होतं. या महापुरात अनेक संसार उद्ध्वस्त झाले तर अनेक रस्त्यावर आले. तर, पुरात अनेक घरांची पडझड झाली. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. त्यापैकीच एक हकीम कुटुंबीय. या कुटुंबाला राज्य सरकारची 95 हजारची मदत तर झाली. मात्र, केंद्राकडून येणारी मदत अद्यापही प्रलंबित आहे. मदत अपुरी असल्याने हसन हकीम आणि त्यांच्या पत्नीने यांनी थेट जयंत पाटील यांच्याकडे दाद मागितली. जयंत पाटील यांनी या कुटुंबाचा प्रश्न समजून घेत आपल्या जवळ असलेल्या प्राशसकीय अधिकाऱ्यांना तात्काळ समस्येची सोडवणूक करण्यासाठी आदेश दिले. औरंगाबादेतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मराठा क्रांती मोर्चाचा गोंधळ, जयंत पाटलांसमोर घोषणाबाजी पूरग्रस्तांसाठी 15 हजार तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या पुरातील पीडितांच्या कुटुंबीयांना तत्कालीन महाराष्ट्राने पूरग्रस्तांसाठी 15 हजार, तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली होती. यात घरात पाणी शिरलेल्या पूरग्रस्तांसाठी 10 तसेच 15 हजार हजार रुपये, पुरामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी 5 लाख रुपये तसेच पुरग्रस्तांना अन्नधान्याची मदत केली होती. मात्र, ही मदत तुटपुंजी असून अजूनही काही संसार उभे राहिले नसल्यांचं पूरग्रस्तांचं म्हणणं आहे. दरम्यान, राज्यात आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. जवळपास 50 च्यावरती लोकांना या महाप्रलयात आपला जीव गमवावा लागला. तर, हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं होतं. पशुधनाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अहवाल मिळाला आहे. Aurangabad Maratha Protest in NCP Meeting | औरंगाबादेतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मराठा क्रांती मोर्चाचा गोंधळ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget