Yakub Memon : याकूब मेमनची कबर विश्वस्त शोएब खतीब यांनी नातेवाईक रऊफ मेमन यांना विकली, बडा कब्रस्तानचे रहिवाशी शाहिद शेख यांचा दावा
Yakub Memon Controversy : रौफ मेमनला विकले जाणारे दुकान बांधण्यासाठी कब्रस्तानजवळील एक शौचालय पाडण्यात आल्याचाही दावा स्थानिक रहिवासी शाहिद शेख यांनी केला आहे.
मुंबई : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीबाबत (Yakub Memon Grave) एक नवी माहिती समोर आली आहे. याकूब मेमनची कबर बडा कब्रस्तानचे विश्वस्त शोएब खतीब यांनी त्यांचे नातेवाईक रऊफ मेमन यांना विकली होती, असा दावा बडा कब्रस्तान येथील स्थानिक रहिवासी शाहिद शेख यांनी केला आहे.
शाहिद शेख म्हणाले, कबरीवर विद्युत रोषणाई आणि फोकस एक वर्षापेक्षा जास्त काळापासून आहे. त्यासाठी एक खाजगी स्विच आणि मीटर पुरवण्यात आला आहे. स्थानिकांनी विरोध केल्यावर त्यांना अंडरवर्ल्डच्या नावावर धमक्या देण्यात आल्या. याकूब मेमनची कबर बनविण्याच्या सर्व प्रक्रियेत विश्वस्त कार्यालयात रात्रीच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. जिथे शालीमार आणि इतर हॉटेल्समधून जेवण यायचे.
शोएब खतीब यांनी गेल्या दोन वर्षांत अनेक कबरी विकल्या
विश्वस्त शोएब खतीब यांनी गेल्या दोन वर्षांत अनेक कबरी विकल्या आहेत. बहुतेक कबरीच्या डील रौफ मेमनच्या मदतीने करण्यात आली होती. व्यक्तीची पार्श्वभूमी तपासल्यानंतर ही कबर पाच, सात आणि आठ लाख रुपयांना विकली गेली आहेत. तसेच शोएब खातीम दावा करतो की ,कोरोनाच्या काळात लोकांना मदत केली जात होती. परंतु त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे लोकांना पुरण्याचे शुल्क आकारले आणि मोठी रक्कम घेतली. तसेच रौफ मेमनला विकले जाणारे दुकान बांधण्यासाठी कब्रस्तानजवळील एक शौचालय पाडण्यात आल्याचाही दावा शाहिद यांनी केला आहे.
40 वर्षांपासून बडा कब्रस्तानमध्ये राहणारे शाहिद शेख म्हणाले की, कबर विक्रीचा घोटाळा उघडण्यासाठी पोलीस आणि महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे आणि चौकशी करावी. शोएब खतीबला अटक झाल्यावर याकुब मेमनची कबर विकण्यामागील सर्व सत्य समोर येईल. सजावटीबाबत माहिती माध्यमांसमोर येताच बडा कब्रस्तानचा एक व्यवस्थापक ज्याला सर्व तपशील माहित आहेत त्याला कब्रस्तानमधून हलवण्यात आले आहे. तसेच, पोलिसांचे एक पथक कब्रस्तान येथे तैनात आहे. जे कोणालाही आत प्रवेश करू देत नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या: