एक्स्प्लोर

धनदांडगे, राजकारण्यांनी व्यवस्था वाकविण्याचा प्रयत्न केल्यास सोडणार नाही; हिट अँड रन प्रकरणावरुन एकनाथ शिंदे कडाडले

Worli Hit And Run Case: महाराष्ट्रामध्ये ‘हिट अँड रन’ च्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Worli Hit And Run Case मुंबई: मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात (Worli Hit And Run) बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडण्याच्या प्रकरणात मिहीर शहा (Mihir Shah) हे नाव समोर आलं आहे. आरोपी मिहीर शहा हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. राजेश शहा (Rajesh Shah) यांना अटक करण्यात आली आहे. मिहीर शहाचा शोध मात्र पोलीस घेत आहेत. याचदरम्यान महाराष्ट्रामध्ये ‘हिट अँड रन’ च्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत.

काही धनदांडगे, राजकारणी लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्था वाकविण्याचा प्रयत्न करत असतील, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही देखील एकनाथ शिंदे यांनी दिला. हिट अँड रन प्रकरणात कोणीही असो, कोणालाही सोडणार नाही. कडक कारवाई केली जाईल. कायद्यासमोर सर्व समान आहे. जे हॉटेल रात्री उशीरापर्यंत सुरु असतात, त्यांचे लायसन्स रद्द करण्याचे मी आदेश दिले आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिले.

सुरक्षित महाराष्ट्रासाठी आम्ही कटिबद्ध- एकनाथ शिंदे

सर्वसामान्य नागरिक हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ‘हिट अँड रन’ सारखी प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि पीडितांना न्याय देण्याचे निर्देश एकनाथ शिंदेंनी पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणांमध्ये दोषी कुणीही असो, मग तो कितीही श्रीमंत, प्रभावशाली, किंवा नोकरशहा, लोकप्रतिनिधींची मुलं तसेच कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी व आमचे शासन पीडित आणि त्यांच्या कुटुंबिंयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व जनतेसाठी, सुरक्षित महाराष्ट्रासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई पोलिसांना कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पुणे पोर्शे प्रकरणानंतर पुणे पोलीस आणि गृहखात्यावर असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशातच मुंबईतील वरळीत घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाची तुलनाही पुणे पोर्शे प्रकरणाशी केली जात आहे. तसेच, या प्रकरणातील मुख्य आरोपी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पालघरचा उपनेता असल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं होतं. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वरळीतील हिट अँड रन प्रकरणात कुणालाही अभय दिलं जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिला जाईल, असं स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा याप्रकरणी कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पोलीस खात्याला दिले आहेत. 

आरोपी दारूच्या नशेत-

24 वर्षीय मिहीर शहा देखील व्यावसायिक आहे. तो दारूच्या नशेत असताना हा अपघात घडल्याचा संशय आहे. तो रात्री जुहू येथील एका बारमध्ये मित्रांसह दारू पार्टीसाठी गेला होता. बारमधून निघाल्यावर तो गोरेगावला गेला. मिहीर फरार झाल्यामुळे तो दारूच्या नशेत होता की नाही, याबाबत निश्चित काही निष्कर्ष काढणे शक्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोणत्या कलमान्वये झाला गुन्हा दाखल?

धरती हिंट अॅण्ड रन प्रकरणात पोलिसांनी कलम २०५, २८९, १२५ (ब), २३८, ३२४ (४) भारतीय न्याय संहितासह कलम १८४, १३४(अ), २३४ (ब), १८७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Jayant Patil on Ajit Pawar : पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
D. K. Shivakumar : महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; पीएम मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TISC Report :  बांगलादेशी, रोहिंग्यांची मुंबईत लोकसंख्या वाढ!Haribhau Rathod on Amit Shah : युतीचं सरकार असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण बंदTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut : 'वर्षा'वरून गुंडांना मदत करण्याचे आदेश - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Jayant Patil on Ajit Pawar : पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
D. K. Shivakumar : महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; पीएम मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Embed widget