एक्स्प्लोर

मुंबईत पोलिस ठाण्यातच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

पार्कसाईट पोलिसांनी या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर अखेर तक्रार नोंदविली आणि आरोपी सनी आणि संतोषला बेड्या ठोकल्या खऱ्या, परंतु कलमे अशी लावली की अवघ्या काही तासातच त्यांची जामिनावर मुक्तताही झाली.

मुंबई : टवाळखोरांकडून आपल्या मुलीला सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून आईने पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसही तक्रार दाखल करुन घेत नसल्याने आईने पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला. मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट पोलिस ठाण्यात ही घटना घडली. शीला मोर्या असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेचे नाव असून, ती विक्रोळी पार्कसाईटच्या वर्षानगर भागात राहते. त्यांची मुलगी सुषमा हिला याच विभागातील सनी बोरडे आणि संतोष निगडेकर वारंवार छेडत असत. अश्लील शिविगाळही करीत असत. गेले अनेक दिवस हा प्रकार सुरु होता. या बाबत पार्कसाईट पोलीस ठाण्यात वारंवार खेटा घालूनही कारवाई होत नसल्याने अखेर या तरुणीच्या आईने पोलीस ठाण्यातच औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या शीला मोर्या यांच्यावर राजवाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. आरोपी काही तासातच सुटले! या प्रकरणात पार्कसाईट पोलिसांनी या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर अखेर तक्रार नोंदविली आणि आरोपी सनी आणि संतोषला बेड्या ठोकल्या खऱ्या, परंतु कलमे अशी लावली की अवघ्या काही तासातच त्यांची जामिनावर मुक्तताही झाली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली, अशी माहिती जरी दिली असली, तरी या महिलेलेला पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याची वेळ का आली, याबाबत मात्र मौन धारण केलं आहे. सध्या शीला मोर्या यांच्यावर राजावाडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. न्याय मिळावा म्हणून एका आईला एवढे टोकाचे पाऊल उचलावे लागते, ही बाब गंभीर असून, यावर गृहखाते काही कारवाई करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget