एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

केसाच्या विगची फसवणूक, महिलेला 37 हजारांची भरपाई

मुंबई : केसांच्या विगबाबत असमाधानी असलेल्या मुंबईच्या एका महिलेला अखेर 8 वर्षांनी न्याय मिळाला आहे. ग्राहक न्यायालयाच्या दणक्यामुळे विग बनवणाऱ्या क्लिनिकला महिलेस 37 हजारांची भरपाई द्यावी लागणार आहे.   2008 मध्ये कांदिवलीत राहणाऱ्या एका महिलेने 18 हजार रुपयांना केसांचा विग खरेदी केला होता. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर विगसाठी 17 हजार, मानसिक त्रासासाठी 10 हजार आणि कायदेशीर लढाईचे 10 हजार अशी 37 हजार रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे.   13 मे 2008 रोजी तक्रारदार महिलेने खारच्या एका क्लिनीकमधून स्वतःसाठी विग बनवून घेतला. तिने स्वतः डिझाईनची निवड केली होती आणि त्यानुसार मोजमाप घेण्यात आलं होतं. त्याचे 18 हजार रुपयेही तिने भरले, मात्र प्रत्यक्ष विग घेताना तो आपल्या पसंतीनुसार बनवला नसल्याचं तिच्या लक्षात आलं.   संबंधित विग केसात नीट बसत नसल्यामुळे तिने तो घेण्यासही नकार दिला. मात्र क्लिनीकमधील एका कर्मचाऱ्याने त्यांना तात्पुरता तो विग वापरण्याचा सल्ला दिला. तरीही पसंत न पडल्यास बदलून देण्याची हमीही त्याने दिली. महिलेने त्यानुसार विग वापरण्यास सुरुवात केली, मात्र तिला प्रचंड त्रास सहन करावा लागला.     तीन महिन्यांनी तिने पुन्हा क्लिनीकमध्ये धाव घेतली. मात्र क्लिनीकमधील कर्मचाऱ्यांना विग बदलण्यासाठी 5 हजार रुपये अधिक भरावे लागतील, असं तिला सांगितलं. यावरही महिलेने होकार दर्शवत एक हजार रुपयांचा अॅडव्हान्स भरला.   नवीन विग घेण्यासाठी गेलं असताना महिलेची पुन्हा निराशा झाली. नव्या विगऐवजी जुन्यातच काही फेरफार करुन तिला सोपवण्यात आला होता. चिडलेल्या महिलेने पैसे परत करण्यास सांगितल्यावर क्लिनीकने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर महिलेने कोर्टाचं दार ठोठावलं, मात्र क्लिनीकच्या कर्मचाऱ्यांनी महिला खोटं बोलत असल्याचा दावा करण्यात आला.   अखेर कोर्टाने महिलेच्या बाजूने निकाल दिला. विगसाठी 17 हजार, मानसिक त्रासासाठी 10 हजार आणि कायदेशीर लढाईचे 10 हजार अशी 37 हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने क्लिनीकला दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Mitkari On Naresh Arora : अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढल्यानं कार्यकर्ते नाराजRamdas Athwale On Fadanvis : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, शिंदेंना कोणतंच आश्वासन दिलं नव्हतंABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Embed widget