एक्स्प्लोर
वीज बिलावरुन राडा, तक्रारदार महिलेचा महावितरणच्या अभियंत्याच्या बोटाचा चावा
उल्हासनगर : बिलाबद्दल तक्रार करण्यास आलेल्या एका महिलेने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या महिला सहाय्यक अभियंत्याच्या बोटाला चावा घेऊन तिला जखमी केलं. शिवाय, कार्यलयातील साहित्याची तोडफोड करून नुकसानही केलं.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रकरण काय आहे?
उल्हासनगर शहरातील केम्प नबंर 4 मधील मोर्यानगरी परिसरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे विभाग 2 आणि उपविभाग 4 चे कार्यालय आहे. नम्रता नावाची महिला वीज बिलाबद्दल तक्रार करण्यासाठी दुपारी साडेबाराच्या सुमाराला त्या कार्यलयात आली. वीज बिल लेखा सहाय्यक कुमारी राधा देशपांडे हिच्या अंगावर वीजबिल फेकून नम्रता या महिलेने शिवीगाळ करीत आरडाओरडा सुरु केली. त्यावेळी सहाय्यक नेहा ढोणे हिने नम्रताला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या नम्रता ने नेहा ढोणे यांच्या बोटाला कडाडून चावा घेवून त्यांना नखाने ओरबडून जखमी करून सरकारी कर्तव्य बजावण्यास प्रतिबंद केला.
तसेच कार्यलयातील 2 संगणकांची तोडफोड करीत कार्यलयातील 30 हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले. नेहा ढोणे यांच्यासह कार्यलयातील इतर कर्मचाऱ्यांना धमकी दिली. याप्रकरणी नेहा ढोणे यांच्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक आव्हाड करीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement