एक्स्प्लोर
मुंबईत रेल्वे रुळांशेजारी तारांचे कुंपण
रेल्वे रुळ ओलांडताना अपघातांना आमंत्रण देणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने नामी शक्कल लढवली आहे. मध्य रेल्वेने नवीन पद्धतीचे तारांचे कुंपण उभारण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला सहा ठिकाणी अशा पद्धतीने कुंपणे बांधण्यात येणार आहे.
मुंबई : रेल्वे रुळ ओलांडताना अपघातांना आमंत्रण देणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने नामी शक्कल लढवली आहे. मध्य रेल्वेने नवीन पद्धतीचे तारांचे कुंपण उभारण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला सहा ठिकाणी अशा पद्धतीने कुंपणे बांधण्यात येणार आहे.
मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर दरवर्षी सुमारे तीन हजार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो, तर तितकेच प्रवासी जखमी होतात. या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत एकूण अपघाती मृत्यूंची संख्या 2800 इतकी नोंदविण्यात आली. त्यातील सर्वाधिक प्रमाण हे रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे असते. त्यावर निर्बंध आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नामी शक्कल लढवली आहे.
रेल्वे रुळ ओलांडण्यास आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने तारांची कुंपणे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एमयूटीपी-3 अंतर्गत 551 कोटी रुपये खर्चून वेगवेगळे उपाय केले आहेत. त्यात पादचारी पूल, संरक्षक भिंती, रेल्वे रुळांशेजारी कुंपणे बांधली जात आहेत.
सध्या अशा प्रकारची कुंपणे ठाणे ते ऐरोली, चिंचपोकळी ते करी रोड आणि परळ ते दादर या दरम्यान एकूण 6 ठिकाणी कुंपणे बांधण्यात येत आहेत. या पद्धतीच्या कुंपणांमुळे रुळ ओलांडणाऱ्यांच्या प्रमाणात घट होईल, असा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement