एक्स्प्लोर

मुंबई लोकल प्रवाशांसाठी बजेटमध्ये काय काय?

नवी दिल्ली : ब्रिटीशांची परंपरा मोडत पहिल्यांदाच सर्वसाधारण बजेटसोबतच रेल्वे बजेट सादर करण्यात आलं. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 चं रेल्वे बजेट सादर केलं. मुंबईतील लोकल रेल्वे प्रवाशांसाठीही जेटलींच्या पोटलीतून काही घोषणा करण्यात आल्या आहेत *मेधा लोकल (मेक इन इंडिया अंतर्गत) एका महिन्याच्या आत रुळांवर येणार, फक्त एक परवानगी बाकी असून सर्व तयारी पूर्ण *एसी लोकल अंतिमतः पश्चिम रेल्वेवर चालणार हे निश्चित, त्यासाठी रेल्वे बोर्डाला पत्र पाठवले आहे. *विरार ते चर्चगेट या मार्गावर एसी लोकल धावणार, मात्र चाचण्या मध्य रेल्वे मार्गावर *पश्चिम रेल्वेवरील 4 स्थानकांचं पुनर्निर्माण होणार. मुंबई सेन्ट्रल, वांद्रे, बोरीवली आणि इंदौर स्थानकाचा समावेश *मध्य रेल्वेवरील लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला-एलटीटी), ठाणे, पुणे या स्थानकांचा पुनर्निर्माण करण्यात येईल. *अनेक ठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी सोय केली जाणार *महिलांच्या सुरक्षेबाबत 50 कोचेसमध्ये सीसीटीव्ही लावण्याचं ठरवलं होतं, त्यापैकी 24 कोचेसमध्ये बसवून झाले *तीन कोचेसमध्ये स्वयंचलित दरवाजे 18 मार्चपर्यंत बसवणार *महाराष्ट्रासाठी एकूण 5958 कोटी रुपये दिले गेले आहेत, पण कोणत्या विभागासाठीआणि प्रोजेक्टसाठी आले, याचे तपशील 2 दिवसांनंतर स्पष्ट होणार. त्यामुळे दोन दिवस मुंबईकरांना वाट पहावी लागणार स्वतंत्र रेल्वे बजेट बंद झालं असलं तरी त्याची स्वायत्तता कायम राहणार असल्याचं अरुण जेटली म्हणाले. रेल्वेतील स्वच्छता, सुरक्षा आणि सुविधांवर अधिकाधिक भर दिला जाईल, प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचं अरुण जेटलींनी सांगितलं. 1 लाख 31 हजारांचं रेल्वे बजेट सरकारने आगामी आर्थिक वर्षासाठी रेल्वेसाठी 1 लाख 31 हजार कोटींची तरतूद केली आहे. विकास कार्यांसाठी रेल्वे सुरक्षा कोषाची स्थापना केली जाईल. यासाठी सरकारने 55 हजार कोटी दिले आहेत. 3500 किमी लांबीचा लोहमार्ग 2017-18 आर्थिक वर्षासाठी 3500 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग बनवला जाण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसंच धार्मिक आणि पर्यटनस्थळांसाठी नव्या गाड्या सुरु करण्याची सरकारची योजना असल्याची त्यांनी सांगितलं. प्रवाशांसाठी आणखी काय सोयी? अरुण जेटली म्हणाले की, “प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुढील पाच वर्षांसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या वेगळ्या फंडांची स्थापना केली जाईल. तसंच 2020 पर्यंत ब्रॉडगेज लाईनवर मानवरहित क्रॉसिंग बंद होईल. याशिवाय देशातील 7 हजार रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे.” दिव्यांगासाठी रेल्वे स्टेशनवर लिफ्ट आणि सरकते जिने लावले जातील. 2019 पर्यंत सर्व रेल्वे गाड्यांमधील शौचालयांचं रुपांतर बायोटॉयलेटमध्ये करण्यात येईल, असंही जेटलींनी यावेळी जाहीर केलं. तर ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही. याचाच अर्थ ई-तिकीटामुळे प्रवाशांचा प्रवास स्वस्त होणार आहे. तसंच नवीन मेट्रो धोरणामुळे तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होती, असंही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे बजेटमध्ये सांगितलं. रेल्वे बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे – 3500 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग बनवला – ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही – 3500 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग बनवला – 7 हजार रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर – प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 1 लाख कोटींचा फंड – ब्रॉडगेज लाईनवर मानवरहित क्रॉसिंग – धार्मिक आणि पर्यटनस्थळांसाठी नव्या गाड्या सुरु करणार – दिव्यांगासाठी रेल्वे स्टेशनवर लिफ्ट आणि सरकते जिने – 7 हजार रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर – 2019 पर्यंत सर्व रेल्वेमध्ये बायोटॉयलेट – IRCTC, IRCON या रेल्वेशी निगडीत कंपन्या लवकरच शेअर बाजारात लिस्ट करणार – सुरक्षा दलातल्या जवानांना त्यांची तिकीटं बुक करण्यासाठी स्वतंत्र सिस्टीम राबवणार

संबंधित बातम्या :

मध्यमवर्गीयांना दिलासा, सर्व बजेट एकत्र

बजेटमधील तुमच्या फायद्याच्या 10 महत्वाच्या गोष्टी

अर्थसंकल्पामुळे काय महाग, काय स्वस्त?

3 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त, तुमची दरमहा बचत किती?

ब्रिटीश सरकारच्या दोन परंपरा मोदी सरकारकडून मोडीत

3 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त, 3 ते 5 लाखाच्या टप्प्यात 50% कपात

ई-तिकीटासाठी सेवाकर नाही, रेल्वे बजेटमध्ये घोषणा

ऐतिहासिक शब्दाची व्याख्या स्पष्ट करणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री

नोटाबंदी गेल्या बजेटमध्ये का जाहीर केली नाही? : उद्धव ठाकरे

हा ‘शेर ओ शायरी’चा अर्थसंकल्प : राहुल गांधी

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget