एक्स्प्लोर
Advertisement
अपघातामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली
मुंबईः मुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गाची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली आहे. गोरेगाव स्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे पश्चिम रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या मार्गावरील लोकल्स 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.
चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद लोकल जवळपास 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर अप स्लो लोकल तब्बल 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. दरम्यान चाकरमान्यांना सकाळी सकाळी मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. अपघातग्रस्त व्यक्तिला रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
डाऊन मार्गावरील वाहतुकीवर या अपघाताचा कसलाही परिणाम झाला नसल्याची माहीत आहे. वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. मात्र यासाठी अजून काही कालावधी लागणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement