एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई-अहमदाबाद रेल्वे फुल्ल, पश्चिम रेल्वेची कोलांटउडी
मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रवाशांची संख्या घटलेली नाही, अशी नवी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
मुंबई: पश्चिम रेल्वेने मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गाबाबत आरटीआयमध्ये दिलेल्या माहितीवरुन कोलांटउडी मारली आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रवाशांची संख्या घटलेली नाही, अशी नवी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. इतकंच नाही तर हा मार्ग ‘ऑफ सिझन’मध्येही फुल्ल असतो, त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक फायद्याची असल्याचं पश्चिम रेल्वेने म्हटलं आहे.
एकीकडे पश्चिम रेल्वेने हा दावा केला असला, तरी दोनच दिवसांपूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीत, या मार्गावरील 40 टक्के सीट्स रिकाम्या असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे साध्या रेल्वेला प्रवासी नाहीत तर बुलेट ट्रेनला कुठून येणार असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता.
गलगलींना दिलेली आरटीआयमधील माहिती
मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत गेल्या 3 महिन्यात 40 टक्के, तर अहमदाबाद ते मुंबई 44 टक्के सीट्स रिकाम्या असल्याची माहिती गलगलींना देण्यात आली होती.
पश्चिम रेल्वेने गलगलींना 1 जुलै 2017 पासून 30 सप्टेंबर 2017 पर्यंतची माहिती दिली होती. या 3 महिन्यात पश्चिम रेल्वेला 29.91 कोटींच्या महसुलावर पाणी सोडावं लागल्याची कबुली रेल्वेने दिली होती.
नवी माहिती
मात्र आता मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी नवी माहिती दिली आहे. त्यानुसार मुंबई-अहमदाबाद या मार्गावर 34 रेल्वे धावतात. यामध्ये 9 थेट आणि 25 अन्य रेल्वे अहमदाबादमार्गे जातात. गेल्या तिमाहीतील या मार्गावरील उत्पन्न हे 233 कोटींवर होतं.
आरटीआयमधील दिलेली माहिती ही केवळ मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद आणि अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल या थेट स्थानकांदरम्यानची होती. त्यामुळेच 30 कोटींचा तोटा झाल्याची माहिती देण्यात आली होती, असं रवींद्र भाकर यांनी सांगितलं.
त्या माहितीमध्ये त्या मार्गावरील अंतगर्त स्टेशन किंवा प्रवाशांची माहिती दिलेली नव्हती. म्हणजे मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर मधल्या स्टेशन्सवर बसणाऱ्या प्रवाशांबद्दल माहिती देण्यात आलेली नव्हती, असंही भाकर म्हणाले.
याशिवाय जुलै ते सप्टेंबर यादरम्यान प्रवासी संख्या कमी असते, तरीही या मार्गावर शंभर टक्के फुल्ल वाहतूक होती, असाही दावा भाकर यांनी केला.
यासाठी त्यांनी आकडेवारी सादर केली. थेट असलेल्या नऊ ट्रेनमध्ये 8 लाख तीन हजार 150 बर्थ आहेत. मात्र त्यासाठी 8 लाख 30 हजार 978 म्हणजेच 103 टक्के बुकिंग आहे.
दुसरीकडे अहमदाबादमार्गे जाणाऱ्या 25 रेल्वेमध्ये 10 लाख 70 हजार 710 बर्थ आहेत. त्यासाठी 12 लाख 30 हजार 585 म्हणजेच 115 टक्के बुकिंग आहे, असा दावा रवींद्र भाकर यांनी केला.
संबंधित बातम्या
मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत 40 टक्क्यांहून अधिक सीट्स रिकाम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
Advertisement