BMC : मुंबईतील 'या' भागात बुधवारी आणि गुरूवारी पाणीपुरवठा बंद
मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये काही भागात बुधवार (18 मे) सकाळी 10 ते गुरुवार (19 मे) सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे पूर्व उपनगरामध्ये 'एन' विभागातील सोमय्या नाल्याखालून महानगरपालिका वसाहत, विद्याविहार या ठिकाणी जलवाहिन्या वळविण्याचे काम बुधवार (18 मे) सकाळी 10 पासून ते गुरुवार, (19 मे) सकाळी 10 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे.
एल पूर्व विभाग : राहुल नगर, एडवर्ड नगर, पानबजार, व्ही. एन. पूर्व मार्ग, नेहरु नगरच्या दोन्ही बाजू, जागृती नगर, शिवसृष्टी नगर, एस. जी. बर्वे मार्ग, कसाईवाडा पंपिंग, हिल मार्ग, चाफे गल्ली, चुनाभट्टी पंपिंग स्वदेशी मिल मार्ग - (पहाटे 5.30 ते सकाळी 8.30 आणि रात्री 9 ते मध्यरात्री 3 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).
एन विभाग : राजावाडीचे सर्व क्षेत्र, (एम. जी. मार्गाची पश्चिम बाजू), चित्तरंजन नगर, वसाहत, आंबेडकर नगर, निळकंठ व्हॅली, राजावाडी रुग्णालय परिसर, विद्याविहार स्थानक, पूर्व बाजूचा रस्ता, ओ. एन. जी. सी. वसाहत मोहन नगर, कुर्ला टर्मिनल मार्ग, ओघड भाई रस्ता, आनंदी रस्ता रामजी, आशर रस्ता - (मध्यरात्री 3 ते सकाळी 9.30 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे).
एम पश्चिम विभाग : टिळक नगर सर्व क्षेत्र, ठक्कर बाप्पा वसाहत, वत्सलाताई नगर, सहकार नगर, आदर्श नगर, राजा मिलिंद नगर, राजीव गांधी नगर, गोदरेज आवार, कुटीरमंडल, सम्राट अशोक नगर, बीट नंबर 149 व 151 - (पहाटे 5 ते सकाळी 9.30 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).
एफ उत्तर विभाग : वडाळा ट्रक टर्मिनल, न्यु कफ परेड, प्रतीक्षा नगर, पंचशिल नगर, शीव पूर्व आणि पश्चिम (बुस्टींग), सायन कोळीवाडा, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, सरदार नगर, इंदिरा नगर, वडाला मोनोरेल डेपो - (पहाटे 4 ते सकाळी 9.30 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे).
एफ दक्षिण विभाग :
शहर उत्तर - दादर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातनकर मार्ग, बी. जे. देवरुककर मार्ग, गोविंदजी केणे मार्ग, हिंदमाता - (सकाळी 7 ते 10 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा कमी दाबाने होईल).
शहर दक्षिण – परळ, लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली - (पहाटे 4 ते सकाळी 7 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा कमी दाबाने होईल).
पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.