एक्स्प्लोर

सिडकोची 'स्वप्नपूर्ती' की 'जलपूर्ती'? खाजगी बिल्डरच्या बांधकामामुळे सोसायटीत घुसले पाणी

खारघर सेक्टर 36 येथे सिडकोनिर्मित स्वप्नपूर्ती सोसायटीत मागील दोन वर्षांपासून पाणी साठण्याचा प्रकार घडत आहे. सिडकोने स्वप्नपूर्ती सोसायटी तयार करताना आजूबाजूच्या बिल्डरांना पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याबाबत नियोजन करण्याची व्यवस्था केलेली नाही.

नवी मुंबई : सिडकोने खारघरमध्ये गरिबांसाठी उभारलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा गृहप्रकल्प स्वप्नपूर्तीला पहिल्याच पावसाचा फटका बसला आहे. सिडकोच्या ढिसाळ आणि बिल्डरधार्जिन नियोजनामुळे स्वप्नपूर्ती सोसायटीत गुडघाभर पाणी साचले. विशेष म्हणजे पाणी साचल्याची तक्रार एक दिवस आधी करून सुद्धा सिडकोच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे गेले दोन रात्र स्वप्नपूर्ती सोसायटीतील रहिवाशी भीतीच्या सावटाखाली आहेत.

खारघर सेक्टर 36 येथे सिडकोनिर्मित स्वप्नपूर्ती सोसायटीत मागील दोन वर्षांपासून पाणी साठण्याचा प्रकार घडत आहे. सिडकोने स्वप्नपूर्ती सोसायटी तयार करताना आजूबाजूच्या बिल्डरांना पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याबाबत नियोजन करण्याची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे या बांधकामांवर पडणारे पावसाचे पाणी सोसायटी पाठीमागील शेतातील खोलगट भागात गोळा होतो. या ठिकाणी स्वप्नपूर्ती सोसायटीची संरक्षण भिंत आहे. खोलगट भागात साठलेल्या पाण्याला बाहेर पडण्यास वाट नसल्यामुळे साठलेल्या पाण्यात प्रचंड दबाव निर्माण होऊन पाणी थेट संरक्षण भिंतीच्या निकृष्ट बांधकामाच्या खालून सोसायटीत घुसत आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोसायटीत गुडघाभर पाणी साचले आहे.

अक्षरशः एखाद्या नदीतून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे इमारतींखाली साठलेले पाणी प्रवेशद्वाराच्या दिशेने वेगात वाहत आहे. पावसाच्या संतत धारेमुळे पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. हळू-हळू साठलेल्या पाण्याचे सोसायटीच्या आतील इमारती वेढल्या गेल्या. तोपर्यंत इमारतींखाली उभी केलेल्या वाहनांची चाके पाण्यात बुडाली होती. इमारतींच्या वरच्या मजल्यांमध्ये राहणारे रहिवाशी पावसाचा हा खेळ खिडकीतून उघड्या डोळ्यांनी पाहत होते. सोसायटीतील काही सतर्क रहिवाशांनी एक दिवस आधीच सिडकोच्या अभियंत्यासोबत संपर्क करून परिस्थिती कानावर घातली.

मात्र अभियंत्यांनी नेहमी प्रमाणे नागरिकांच्या तक्रारीकडे कानाडोळा केला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे स्वप्नपूर्ती सोसायटीला तळ्याचे रूप प्राप्त झाले. सोसायटी आलेल्या पाण्यामुळे साप सुद्धा फिरताना काही नागरिकांनी पाहिले. त्यामुळे साठलेल्या पाण्यामुळे अधिकच धोका वाढला आहे. याबाबत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना या परिस्थितीबाबत अवगत असता याबाबत तात्काळ समस्या सोडवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती चंद्र यांनी दिली.

सिडकोचे बिल्डरधार्जिन नियोजन

स्वप्नपूर्ती सोसायटीच्या पाठीमागील शेत जमिनीत नामांकित बिल्डरांच्या टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम करताना विकासकांनी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था न केल्यामुळे वाहत्या पाण्याला जाण्यासाठी वाट राहिली नाही. याठिकाणी नाला तयार करण्याचे शहाणपण अद्याप सिडकोला सुचलेले नाही. त्यामुळे दर पावसाळ्यात रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget