एक्स्प्लोर

Crime News: प्रेयसीला फिरवण्यासाठी मोटारसायकलींची चोरी, आरोपी जेरबंद, विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई

मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. हा आरोपी प्रेयसीला फिरवण्यासाठी मोटरसायकलींची चोरी करत असल्याचे उघड झाले आहे.

Crime News: प्रेयसीला फिरवण्यासाठी मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून, आरोपीकडून तीन गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. हर्ष थापा (20 वर्ष) असे मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपीचे नाव असून, तो उल्हासनगर परिसरात राहणारा आहे.

दिनेश खैरे हे बिल्डर संजय वासवानी यांच्याकडे सुपरवायझरचे काम करतात. वासवानी यांनी खैरे यांना ये जा करण्यासाठी मोटरसायकल दिली होती. खैरे हे जुन्या महाराष्ट्र बँकेजवळील हंसधाम सोसायटीत राहत असून, त्यांनी 30 एप्रिलला रात्री दहा वाजता पार्किंगमध्ये मोटरसायकल उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खैरे पार्किंगमध्ये गेले असता मोटरसायकल गायब झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, पोलिसांनी पार्किंगमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक तरुण मोटरसायकल काढत असल्याचे उघड झाले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांच्या टीमने या चोराचा मागोवा घेतला असता उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळील सप्तश्रृंगी अपार्टमेंट सोसायटीमधील वॉचमनचा मुलगा हर्ष थापा याने ही मोटरसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. हर्ष हा सुरुवातीला पोलिसांना तपासात सहकार्य करत नव्हता. मात्र, पोलिसांनी खाकी दाखवत त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, लव्हस्टोरीमधील प्रेमिकेला फिरवण्यासाठी तीन मोटारसायकली चोरल्याचे त्याने कबुल केले. दरम्यान पोलिसांनी त्या तिन्ही गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

INFOCOM Mumbai : 'इन्फोकॉम' परिषदेत आयटी मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती; एआय आणि डिजिटल परिवर्तनावर मंथन
'इन्फोकॉम' परिषदेत आयटी मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती; एआय आणि डिजिटल परिवर्तनावर मंथन
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
Monsoon Rain El NINO: महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?
महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?
Mumbai News: मुंबईच्या बीकेसीमधील 5 एकर जमिनीवर एमएमआरडीए अधिकाऱ्यांचा डोळा? वरुण सरदेसाई याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले...
मुंबईच्या बीकेसीमधील 5 एकर जमिनीवर एमएमआरडीए अधिकाऱ्यांचा डोळा? वरुण सरदेसाई याचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले...

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
Share Market : ट्रम्प यांच्या वेटिंगमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Embed widget