एक्स्प्लोर

रस्त्यावरील खड्ड्यामुळे विरारमधील महिलेच्या हत्येचा उलगडा

महिलेला मारल्यानंतर मारेकरी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जात होते. त्यावेळी रस्त्यावरच्या खड्डयात बाईक घसरली आणि हा संपूर्ण बनाव गावकऱ्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणला.

विरार : आजवर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक जणांचे जीव गेले आहेत. मात्र विरारमध्ये चक्क रस्त्यावरील खड्डयामुळे एका हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावताना खड्ड्यात बाईक पडल्यानंतर हा बनाव उघडकीस आला. पोटगीची रक्कम वाचवण्यासाठी एका रेल्वे कर्मचाऱ्याने घटस्फोटित पत्नीची हत्या करण्यासाठी अडीच लाखांची सुपारी दिली होती. महिलेला मारल्यानंतर मारेकरी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जात होते. त्यावेळी रस्त्यावरच्या खड्डयात बाईक घसरली आणि हा संपूर्ण बनाव गावकऱ्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणला. विरार पूर्वेकडील करजोण या गावातील बोदणपाडा येथे रस्त्यावर एका 54 वर्षीय महिलेचा मृतदेह विरार पोलिसांना सापडला. रात्रीच्या अंधारात पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवून सात आरोपींना अटक केली. मयत रमाबाई नामदेव पाटील ही विरारच्या नारंगीपाडा येथील रहिवाशी होती. तिचा पती नामदेव पाटील यानं दुसरं लग्न केलं होतं. घटस्फोटाची केस सुरु असताना रमाबाई पोटगीची रक्कम नामदेवकडे मागत होती. नामदेव रेल्वेत कर्मचारी आहे. पोटगीची रक्कम द्यायला लागू नये म्हणून, रमाबाईला ठार मारण्यासाठी करजोण गावाच्या पुढे राहणाऱ्या चंद्रकात पडवळेला त्याने  अडीच लाखांची सुपारी दिली. पडवळेने या कटात एका महिलेसह आणखीन पाच जणांना सामील केलं. आरोपी वंदना पवारने 9 सप्टेंबरला रमाबाईला काम देण्याच्या बाहण्याने करजोण येथील एका फार्म हाऊसला बोलावलं. तिला रात्रीच्या वेळी गावठी कोंबडा कापून, चांगलं खाऊ-पिऊ घातलं आणि शेवटी तिचा नायलॉनच्या दोरीनं गळा  आवळून खून केला. अंधार झाल्यावर आरोपींनी मयत रमाबाईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं. दोघांनी मृत रमाबाईला बाईकवर मध्ये बसवून मृतदेहाची विल्हेवाट लावायला निघाले. मात्र तेवढ्यात बादणपाडा येथे रस्ता खराब असल्याने बाईकवरुन तिघेही पडले. कुत्रे भुंकण्याच्या आवाजाने शेजारील गावकरी बाहेर आले. त्यामुळे दोघांनी मृतदेह तसाच टाकून पोबारा केला. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी पती नामदेव पाटीलसह चंद्रकांत पडवळे, पांडुरंग कदम, लक्ष्मण कोबाड, लक्ष्मण पवार, राकेश पवार, वंदना पवार या सात जणांना अटक केली.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget