एक्स्प्लोर

Viral Video : वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या मारकुट्या आजोबांविरोधात गुन्हा दाखल

मारहाणीचा व्हिडीओ व्हायर झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन घरातील महिलांना जाब विचारला. 

कल्याण : घरगुती वादातून आपल्या 80 वर्षीय वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या 85 वर्षीय वृद्ध व्यक्तीविरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे. एबीपी माझाने बातमी प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. घरातून कुणीही तक्रार दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनीच आयपीसी कलम 323, 324, 504, 506 अंतर्गत  गजानन बुवा चिकनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गजानन बुवा चिकनकर यांचा पोलीस शोध घेत आहेत. 

मारहाणीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. विशेष म्हणजे घरातील इतर महिला या व्हिडीओमध्ये दिसत होत्या. मात्र कुणीही या मारहाणीला विरोध केला नाही. या मुद्दावरुन शिवसेनेच्या महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन घरातील महिलांना जाब विचारला. 

मारकुट्या आजोबांवर गुन्हा दाखल करा- चित्रा वाघ यांची मागणी 

मारकुट्या आजोबांनी आजीला मारहाण केल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. मात्र अद्याप आजोबांवर गुन्हा दाखल झाला नाही. हिललाईन पोलीस ठाण्यातील पोलीस त्यांच्या घरी जाऊन आले. मात्र घरच्यांनी कोणीही तक्रार दिली नाही. त्यामुळे सुमोटो गुन्हा दाखल करा आणि आजोबांवर कारवाई करा अशी मागणी भाजपा नेत्या वाघ यांनी केली आहे.

Viral Video : आजीला बेदम मारहाण! 'तो' संताप आणणारा व्हिडीओ तुम्हीही पाहिलाय ना? जाणून घ्या त्या घटनेबाबत..

मलंगगड जवळील द्वारली गावच्या हद्दीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पाण्याचा वादातून एका 85 वृद्धाने आपल्या 80 वर्षाच्या वृद्ध पत्नीला बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. गजानन चिकणकर असे या वृद्ध इसमाचं नाव आहे. हा व्हिडीओ आठवड्याभरापूर्वीचा असून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आजोबांविरोधात कारवाई केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी, आगीचं नेमकं कारण काय?
धक्कादायक! भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी, आगीचं नेमकं कारण काय?
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget