(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : आजीला बेदम मारहाण! 'तो' संताप आणणारा व्हिडीओ तुम्हीही पाहिलाय ना? जाणून घ्या त्या घटनेबाबत..
कल्याण मलंगगड जवळील द्वारली गावच्या हद्दीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाण्याचा वादातून एका 85 वृद्धाने आपल्या 80 वर्षाच्या वृद्ध पत्नीला बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे.
कल्याण : कल्याण मलंगगड जवळील द्वारली गावच्या हद्दीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाण्याचा वादातून एका 85 वृद्धाने आपल्या 80 वर्षाच्या वृद्ध पत्नीला बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. गजानन चिकणकर असे या वृद्ध इसमाचं नाव आहे. हा व्हिडीओ आठवड्याभरापूर्वीचा असून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाढ झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. हिल लाईन पोलिसांनी संबंधित कुटुंबाला समज दिली आहे व व्हिडीओच्या आधारे हिललाईन पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करीत आहे. परंतु यासंदर्भात पोलिसांनी मीडियाशी बोलण्यास यावेळी नकार दिला आहे.
माहितीनुसार, कल्याण जवळ असलेल्या द्वारली गावातील एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत 85 वर्षाचा वृद्ध इसम 80 वर्षांच्या वृद्ध पत्नीला बेदम मारहाण करत आहे. वृद्ध महिला त्याला हात पसरून मारू नका अशी विनंती करतेय मात्र बुवा काही ऐकत नाही. गजानन बुवा चिकणकर असे या वृद्ध इसमाचं नाव आहे. पाण्यावरून या इसमाने वृद्ध पत्नीला मारहाण केली आहे.
31 मे रोजी ही घटना घडली असून त्याच्या नातवाने हा व्हिडिओ बनवला होता. या व्हिडीओ एक वृद्ध आपल्या वृद्ध पत्नीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. ही मारहाण सुरु असताना आजूबाजूला अन्य काही महिला घरातील कामं करताना दिसून येत आहेत. आपल्या पत्नीला मारहाण करणारे गजानन बुवा चिकणकर सध्या आळंदीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गजानन बुवा वारीसाठी आळंदीला गेल्याची माहिती मिळाली. त्यांच्या पत्नीने याप्रकरणी काही एक तक्रार नसल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी फोनवर सांगितले. मात्र पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांना समज दिली असून गजानन बुवा आल्यानंतर त्याला देखील समज दिली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. व्हायरल व्हिडीओच्या आधारे हिल लाईन पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करीत आहे. याबाबत पोलिसांनी कॅमेरावर बोलण्यास नकार दिला आहे.