एक्स्प्लोर
व्हायरल सत्य : उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये रहस्यमय मुलगी?
मात्र 'एबीपी माझा'ने या व्हिडीओची सत्यता जाणून घेण्यासाठी थेट सेंट्रल हॉस्पिटल गाठलं आणि या व्हिडीओमागचं सत्य समोर आणलं.

ठाणे : व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर सध्या चांगल्या गोष्टींची देवाण-घेवाण करण्यासाठी कमी आणि अफवा पसरवण्यासाठी जास्त होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये एक रहस्यमय मुलगी दिसल्याचा दावा यात करण्यात आला होता.
मात्र 'एबीपी माझा'ने या व्हिडीओची सत्यता जाणून घेण्यासाठी थेट सेंट्रल हॉस्पिटल गाठलं आणि या व्हिडीओमागचं सत्य समोर आणलं. सीसीटीव्ही फुटेजसारख्या भासवण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक विचित्र मुलगी खिडकीतून निघते आणि थेट खांबावरुन चढून वरच्या मजल्यावर जाते, असं दाखवण्यात आलं आहे.
उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल असो, किंवा कुठलंही सरकारी रुग्णालय असो, अशा ठिकाणी येणारे रुग्ण हे साधारणपणे गोरगरीब, आदिवासी किंवा दुर्गम भागातले असतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेली अशी एखादी गोष्ट त्यांना पटकन खरीही वाटू शकते, ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये भूतं असल्याचे, असे व्हिडीओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर पसरवून कुणाला काय साध्य करायचंय? हे कळायला मार्ग नाही. पण निदान शिकल्या सवरल्या लोकांनी तरी असे व्हिडीओ फॉरवर्ड करताना एकदा त्याची सत्यता पडताळून पाहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मात्र याबाबत जेव्हा सेंट्रल हॉस्पिटलचे डीन डॉ. अशोक नांदापूरकर यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी व्हिडीओत दिसणारी अशी जागाच उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नसल्याचं सांगितलं. सेंट्रल हॉस्पिटलच्या परिसरात लागलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अँगलही त्यांनी दाखवले. शिवाय हाच व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सेंट्रल हॉस्पिटलच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या अनेक हॉस्पिटलच्या नावानं फिरत असल्याची माहिती त्यांनी दिली.व्हायरल सत्य : उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये रहस्यमय मुलगी? https://t.co/CeNfMGpTRD pic.twitter.com/I4uRF5av4f
— ABP माझा (@abpmajhatv) May 19, 2018

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
