एक्स्प्लोर
भाजपकडून विधानपरिषदेसाठी मिलिंद कांबळेंसह पाच नावं चर्चेत!
शिवाय दलित तरुण उद्योजक म्हणून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे यांचंही नाव चर्चेत आहे.

मुंबई : विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी आज भाजप पाच उमेदवारांची घोषणा करणार आहे. या जागांसाठी भाजपच्या कोट्यातून भाई गिरकर, महादेव जानकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, उद्योजक मिलिंद कांबळे यांची नावं चर्चेत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या (5 जुलै) शेवटचा दिवस आहे. नागपुरात काल (3 जुलै) भाजपच्या कोअर ग्रुपच्या बैठकीत या नावांची शिफारस करण्यात आली असून आज दिल्लीतून यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. भाजपच्या कोट्यातून भाई गिरकर, महादेव जानकर, यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर कोळी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी ठाण्याच्या कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांचं नाव पुढं केलं जातं आहे. मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड या कोकण किनारपट्टीत एकूण 76 मतदारसंघात कोळी समाजाची निर्णायक मतं असून त्यातील किमान 45 ते 50 जागा जिंकण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. त्यात मुंबईचे गावठाण, मच्छिमार समाजाच्या समस्या, सीआरझेड अशा विविध विषयांवर लढणारा भाजपला चेहरा हवा आहे. शिवाय दलित तरुण उद्योजक म्हणून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे यांचंही नाव चर्चेत आहे. मिलिंद कांबळे हे स्वतः तर यशःस्वी उद्योजक आहेतच शिवाय डिक्कीच्या माध्यमातून त्यांनी अनेक दलित युवकांना उद्योग आणि व्यापाराच्या क्षेत्रात यशवीपणे पाय रोवण्यास मदत केलेली आहे. 2013 मध्ये भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी मराठवाड्यातून एक उमेदवार देण्यावर भाजपचा भर असणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























