एक्स्प्लोर
इंधन दरवाढीचा फटका, भाजीपाला दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ
डिझेल 76 तर पेट्रोल 87 रुपयांच्या घरात गेलं आहे. त्यामुळे भाजीपाला किंमती किलोमागे 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

नवी मुंबई : वाढत चाललेल्या डिझेल आणि पेट्रोल किंमतीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर जाणवू लागला आहे. वाढलेल्या किंमतीचा सर्वात जास्त फटका रोजच्या लागणाऱ्या भाजीपाल्याला बसला आहे. गेल्या 15 दिवसांच्या किंमती पाहता सध्या दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढला आहे. विशेष म्हणजे वाशी 'एपीएमसी'मध्ये भाजीपाला आवक नेहमीप्रमाणे 550 ते 600 गाड्या होत असली तरी या किंमती वाढताना दिसत आहेत. डिझेल 76 तर पेट्रोल 87 रुपयांच्या घरात गेलं आहे. त्यामुळे भाजीपाला किंमती किलोमागे 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. भाजीपाला सध्याची किंमत मागील किंमत (सर्व दर प्रति किलो रुपये) वांगी - 60-70 40 -50 दोडका - 65 - 75 40 - 50 कार्ली - 65 - 70 35 - 45 शेवगा 80 - 90 50 - 60 कोबी - 50 - 60 30 - 40 फ्लॉवर - 50 - 60 25 - 35 गाजर - 60 - 70 35 - 45 काकडी - 40 - 50 25-35 वटाणा - 90- 100 70-80 टोमॅटो - 40-50 30 - 40 प्रति जुडी कोथिंबीर - 25-30 10-20 मेथी - 20-30 10-20 पालक - 15-25 10-20
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























