एक्स्प्लोर
चिमुकलीचा पाठलाग करुन छेड काढणारा सीसीटीव्हीत कैद
वसईतील एक विकृत तरुण लहानग्या मुलींना एकटं गाठून त्यांच्यासोबत छेडछाड करत आहे. वसईच्या आनंद नगर परिसरात अशीच एक घटना घडली आहे. हा विकृत तरुण सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
मुंबई : वसईतील एक विकृत तरुण लहानग्या मुलींना एकटं गाठून त्यांच्यासोबत छेडछाड करत आहे. वसईच्या आनंद नगर परिसरात अशीच एक घटना घडली आहे. हा विकृत तरुण सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
काल संध्याकाळी सहा वाजता एक दहा वर्षाची मुलगी रस्त्यालगतच्या फुटपाथ वरुन ट्युशनला जात होती. त्याचदरम्यान एका तरूणाने या मुलीचा पाठलाग केला. ती मुलगी एका इमारतीच्या विंगमध्ये गेल्यावर, तो विकृत तरुणही विंगमध्ये गेला. तिथे तिची छेड काढली. त्या नराधमाने मुलीचा चावा घेतल्याचे बोलले जात आहे.
हा तरूण चांगल्या वेशात असल्याने, त्याच्यावर कोणालाही संशय येत नाही. याबाबत वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याल आली आहे. माणिकपूर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर या आरोपीचा शोध घेत आहेत.
हा इसम जर कोणालाही कुठेही आढळला तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करुन पोलिसांना त्याच्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवा, त्यांची काळजी घ्या असेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement