एक्स्प्लोर

मालगाडीखालून ट्रॅक ओलांडणं अंगलट, विद्यार्थ्याचा चिरडून मृत्यू

वसई : वडिलांच्या सांगण्यावरुन पादचारी पुलाऐवजी मालगाडीखालून ट्रॅक ओलांडणं मुलाच्या जीवावर बेतलं आहे. मालगाडीखाली चिरडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वसईत घडली आहे. विरारमध्ये वडिलांसोबत सुट्टी घालवल्यानंतर शाजू कुटुंब केरळात परतत असताना हा अपघात घडला. जड सामान असल्यामुळे वसई स्टेशनवर मालगाडीखालून जाण्याचा पितापुत्राने निवडलेला शॉर्टकटच लेकाच्या जीवावर बेतला. ऑस्टिन शाजू हा 15 वर्षांचा विद्यार्थी थ्रिसूरला जाण्यासाठी आई आणि धाकट्या बहिणीसोबत ट्रेन पकडणार होता. ऑस्टिनचे वडील शाजू अँथनी हे विरारमध्ये एका खाजगी बँकेत नोकरी करतात. वडिलांबरोबर सुट्ट्या घालवल्यानंतर शाजू यांची पत्नी दोन्ही मुलांसोबत केरळला परत जात होती. शाजू कुटुंब आधी विरारहून वसईला लोकलने आलं. वसई स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर सर्व जण उतरले. अँथनी यांनी पत्नी आणि मुलीला पादचारी पुलाने सात क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर जायला सांगितलं. त्याच प्लॅटफॉर्मवर केरळला जाणारी ट्रेन येणार होती. अँथनी आणि शाजू यांनी पुलाऐवजी ट्रॅक ओलांडून जाण्याचा मार्ग निवडला. जड बॅगांसह बापलेक रेल्वे ट्रॅकवर उतरले. त्याचवेळी पाच आणि सहा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्म दरम्यान मालगाडी थांबली होती. त्यामुळे मालगाडीखालून जाण्याचं त्यांनी ठरवलं. ऑस्टिन मालगाडीखाली बसला आणि अँथनी यांनी त्याला सामान पास करायला सुरुवात केली. इतक्यात मालगाडी सुरु झाली. ऑस्टिनला याची कल्पना नसल्याने तो चाकाखाली चिरडला गेला. आपल्या लेकाला बाहेर खेचण्याच्या प्रयत्नात अँथनींच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. लोकांनी आरडाओरड केल्याने मालगाडी थांबवण्यात आली. त्यानंतर ऑस्टिनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. धक्कादायक म्हणजे हा प्रकार घडला तेव्हा ऑस्टिनची आई आणि बहिण प्लॅटफॉर्मवर दोघांची वाट पाहत उभ्या होत्या. त्यांना सुरुवातीला या अपघाताची कल्पनाही नव्हती. वर्षभरापूर्वीच अँथनी यांची बदली विरार ब्रँचला झाली होती. त्यांचं कुटुंब पहिल्यांदाच मुंबईला आलं होतं. पुढील काही दिवसात ऑस्टिनचा दहावीचा निकाल लागणार होता. वसई स्टेशनवर अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून पादचारी पुलाचा वापर करण्याऐवजी मालगाडीखालून जाण्याचा प्रयत्न करतात. या स्टेशनवर मालगाड्या बराच वेळ थांबून असतात, मात्र त्या सुटण्यापूर्वी कुठलाही सिग्नल दिला जात नाही, असं वसई स्थानकातून नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Embed widget