एक्स्प्लोर
तबरेजच्या हत्येचा उल्लेख करत टिक टॉकवर व्हिडीओ, मुंबईतील पाच तरुणांवर गुन्हा
पाच तरुणांनी 'टीम 07' या नावाखाली व्हिडीओ बनवून तो टिक टॉकवर अपलोड केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी झारखंडमधील तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख केला आहे.
मुंबई : मुंबईतील पाच तरुणांवर टिक टॉक अॅपवर आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी झारखंडमधील तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख केला आहे. जर त्याच्या मुलाने उद्या बदला घेतला तर प्रत्येक मुसलमान दहशतवादी असतो हे म्हणू नका, असं सांगत हा व्हिडीओ बनवला आणि तो अपलोड केला. त्याला काही क्षणात प्रसिद्धी मिळाली आणि तो व्हायरल देखील झाला.
या पाच तरुणांची एकत्रित फॉलोअर्सची संख्या ही चार कोटी इतकी आहे. त्यांनी 'टीम 07' या नावाखाली व्हिडीओ बनवून तो अपलोड केला होता. या पाच तरुणांमध्ये फैजल शेख, हसनैन खान, अदनान शेख, फैज बलोच आणि साधन फारुकी यांचा समावेश आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी रमेश सोळंकी यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, मुंबई पोलिसांच्या एलटी मार्ग पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार करुन कारवाई करण्याची विनंती केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या पाच जणांविरोधात कलम 153 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तर टिक टॉककडून त्यांचं अकाऊंटही सस्पेंड करण्यात आलं आहे.
हा व्हिडीओ दोन समाजांमधील शांतता भंग करुन धार्मिक तणाव वाढवू शकतो. त्यामुळे हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या टिक टॉक अकाऊंटविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच हा व्हिडीओ बनवणाऱ्या आणि त्यात दिसणाऱ्या तरुणांचा शोध सुरु आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
काय आहे तबरेज अन्सारी प्रकरण?
झारखंडच्या सरायकेला-खरसावां जिल्ह्याच्या घातकीडीह गावात स्थानिकांनी बाईक चोरीच्या आरोपात तबरेज अन्सारी नावाच्या तरुणाला एवढी मारहाण केली की त्यात त्याचा मृत्यू झाला. तसंच मारहाणीदरम्यान त्याला 'जय श्री राम' आणि 'जय हनुमान'चे म्हणण्यास सांगितल्याचा आरोप आहे.
मुस्लीम असल्याने तबरेजला मारहाण झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आतापर्यंत या प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली आहे. तर प्रकरण गांभीर्याने न घेतल्याने खरसावां पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि सहाय्यक उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement