एक्स्प्लोर
शहरी नक्षलवाद प्रकरणी आनंद तेलतुंबडेंना 12 फेब्रुवारीपर्यंत दिलासा
सर्वोच्च न्यायालयाने 11 फेब्रुवारीपर्यंत तेलतुंबडे यांना अटकेपासून दिलासा दिलेला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून मुंबईत त्यांना नुकतीच झालेली अटक बेकायदेशीर असल्याचं ठरवत पुणे कोर्टाने त्यांची मुक्तता केली आहे.
मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना 11 फेब्रुवारीपर्यंत अटक करणार नाही अशी ग्वाही दिली. मात्र तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीनाला राज्य सरकारने जोरदार विरोध केला. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी पार पडली.
सर्वोच्च न्यायालयाने 11 फेब्रुवारीपर्यंत तेलतुंबडे यांना अटकेपासून दिलासा दिलेला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून मुंबईत त्यांना नुकतीच झालेली अटक बेकायदेशीर असल्याचं ठरवत पुणे कोर्टाने त्यांची मुक्तता केली आहे. पोलिसांच्या वतीने तेलतुंबडे यांना करण्यात आलेली अटक ही कायदेशीर प्रक्रियेनुसार असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं होतं. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी तेलतुंबडे यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिलाय, असा दावा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.
शहरी नक्षलवाद प्रकरणी पुणे पोलिसांनी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्यासह अन्य 21 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरु असून यातील अनेकांना अटकही करण्यात आली आहे. कॉम्रेड प्रकाश यांच्याकडे सापडलेली पत्रं आणि रोना विल्सन यांच्या लॅपटॉपमधील डेटा यांच्यावरुन तेलतुंबडे आणि इतर सर्वांविरुद्ध पुरेसे पुरावे सापडल्याचं राज्य सरकारने हायकोर्टात म्हटलं आहे. आनंद तेलतुंबडे यांचे बंधू मिलिंद तेलतुंडबे यांना 'कॉम्रेड एम' या नावाने संबोधलं जात असल्याचंही यात म्हटलं आहे. मिलिंद तेलतुंबडे हे या केसमध्ये वॉन्टेड आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement