एक्स्प्लोर

मुलुंडमधील मैदानाच्या काँक्रिटीकरणाला परवानगी कशी? हायकोर्ट

मुलुंडच्या संभाजीराजे मैदानात सुरु असलेल्या विकासकामांसाठीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडतानाची कागदपत्र सादर करा, असे निर्देश देत हायकोर्टानं दिले.

मुंबई: मुलुंडच्या संभाजीराजे मैदानात सुरु असलेल्या काँक्रिटायझेशनला परवानगी कशी मिळाली? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला विचारला आहे. तसंच उद्यापर्यंत सर्व कागदपत्र सादर करण्याचे आदेशही कोर्टाने दिले. मुलुंडच्या संभाजीराजे मैदानात सुरु असलेल्या विकासकामांसाठीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडतानाची कागदपत्र सादर करा, असे निर्देश देत हायकोर्टानं दिले. मार्च 2017 मध्ये पालिका आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, मुंबईतील मोकळ्या मैदानांवर कोणतीही बांधकाम परवानगी मिळणार नाही. असं असतानाही मुलुंडच्या संभाजीराजे मैदानात काँक्रिटायझेशनला परवानगी दिलीच कशी? असा सवाल याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात उपस्थित केला आहे. स्थानिकांचा विरोध असतानाही मुलुंडच्या संभाजी राजे मैदानातील सुरू असलेल्या विकासकामांवरील स्थगिती हायकोर्टानं सोमवारी कायम ठेवली. या मैदानात बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, स्केटिंग ट्रॅक तसेच फुटबॉल खेळण्यासाठीची जागा मुंबई महापालिकेमार्फत विकसित करण्यात येत आहे. याविरोधात रहिवाश्यांच्यावतीनं स्थानिक नेते शिशीर शिंदे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुलुंड पूर्व येथील संभाजीराजे मैदान असून या मैदानालगतच जॉगिंग ट्रॅकही आहे. खेळाच्या अनेक स्पर्धा या मैदानात होत असतानाही पालिका प्रशासनाने अचानक मैदानातील जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. मोकळ्या मैदानावर पालिका विविध खेळाकरिंता जागा विकसित करणार असल्याने, खुल्या मैदानाचा आकार कमी होऊन त्यामुळे मुलांच्या खेळांवर गदा येणार आहे. त्यामुळे मोकळ्या मैदानावर पालिकेने कोणतेही बांधकाम करु नये अशी मागणी करत मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. त्यावेळी मोकळ्या मैदानावर कोणत्याही बांधकामास परवानगी दिली जाणार नसल्याचं 2017 चं पालिकेचं परिपत्रकच याचिकाकर्त्यांनी हायकोर्टासमोर सादर केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lonavala Family Drown : भुशी डॅममध्ये बुडालेले एकाच कुटुंबातले, 2 जण अद्याप बेपत्ताTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Result : पदवीधर , शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आज निकालBeed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Hasan Mushrif: विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Embed widget