एक्स्प्लोर
जेल अधिकाऱ्यांच्या खबरींना फुटकी अंडी दिली म्हणून मंजुळा शेट्येला बेदम मारहाण, साक्षीदार सहकैद्याची कोर्टापुढे साक्ष
23 जूनला शुल्लक कारणावरुन सर्व आरोपींनी मिळून मंजुळा शेट्येला बेदम मारहाण केल्याचं प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं कोर्टाला सांगितलं आहे.
मुंबई : भायखळा जेलमधील वॉर्डन मंजुळा शेट्येने जेल अधिकाऱ्यांच्या दोन खबरींना खराब अंडी दिली, म्हणून सर्व अधिकाऱ्यांनी मिळून तिला बेदम मारहाण केली, ज्यात मंजुळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी नवी माहिती मंगळवारच्या सुनावणीत कोर्टापुढे आली आहे. या खटल्यातील दुसरी साक्षीदार 33 वर्षीय महिला कैदी हर्षदा बेंद्रेची साक्ष नोंदवण्यास कोर्टानं सुरुवात केली आहे. 23 जूनला काही शुल्लक कारणावरून सर्व आरोपींनी मिळून मंजुळा शेट्येला बेदम मारहाण केल्याचं या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं कोर्टाला सांगितलं.
घटनेच्या काही महिने आधी जानेवारी 2017 मध्ये भायखळा जेलमध्ये नियुक्त झालेल्या जेल अधिक्षक मनिषा पोखरकर यांची कैद्यांमध्ये प्रचंड दहशत होती. त्याकधीही कुणाची विचारपूस करत नसत उलट येताजाता कैद्यांना शिवीगाळ करत. मंजुळाला मारहाण केल्यानंतर कोणीही तिला मदत केल्यास तिलाही तशीच मारहाण केली जाईल, अशी धमकीच पोखरकर यांनी बॅरेकमधील अन्य कैद्यांना दिली होती. त्यामुळे मंजुळाला त्या अवस्थेतही मदत करण्याची हिंमत कुणीही केली नाही. असं या साक्षीदारानं कोर्टाला सांगितलं.
मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणी आरोपी महिला जेल अधिकाऱ्यांना हायकोर्टाकडून संधी
पोखरकर यांची भायखळा जेलमध्ये नियुक्ती झाल्यानंतर कैद्यांसाठी काम करणाऱ्या समाजसेविकांनाही जेलमध्ये येण्यास मनाई करण्यात आली. 9 मेला होणाऱ्या पुढील सुनावणीत हर्षदा बेंद्रेची साक्ष सुरु राहील. मंगळवारच्या सुनावणीत आरोपी कोर्टात हजर नसल्यानं ही साक्ष नोंदवण्यास बचावपक्षाच्या वकिलांनी विरोध केला होता. मात्र या केसवर सध्या हायकोर्टाची नजर असल्याने सत्र न्यायालयानं ही मागणी अमान्य केली.
मंजुळा शेट्ये हत्या : पोलिसांच्याच सांगण्यावरून जेल अधिकाऱ्यांना गोवले, आरोपींचा कोर्टात दावा
मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश शायना पाटील यांच्या कोर्टात ही सुनावणी सुरु आहे. मंजुळा शेट्ये प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं सहा जणांविरोधात आरोप निश्चित केले आहेत. कलम 302 नुसार हत्या करणे, कलम 120 ब नुसार हत्येचा कट रचणे, कलम 201 नुसार पुरावा नाहीसा करणे आणि कलम 501 नुसार मरेपर्यंत मारहाण करणे या कलंमांखाली हे आरोप निश्चित करण्यात आलेत. जेल अधीक्षक मनिषा पोखरकरसह महिला जेल पोलीस बिंदू नाईकवडे, वसिमा शेख, शितल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या 6 जेल पोलिसांनी हेतूपरस्पर मंजुळाची हत्या केल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी जेल अधीक्षकांसह सहा जणांवर आरोप निश्चित!
23 जून 2017 च्या रात्री मंजुळा शेट्ये या महिला कैदीला अमानुष मारहाण करण्यात आली, ज्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी एकूण 990 पानांचे आरोपत्र दाखल झाले असून यात 182 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. ज्यात एकूण 97 कैद्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. तर सीसीटीव्ही फुटेज हे या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असल्याचंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.
मंजुळा शेट्ये प्रकरणाचा चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
भारत
राजकारण
Advertisement