एक्स्प्लोर

तुम्ही कोणीही माझं काहीही करू शकत नाही, तुम्हा सर्वांना मी पुरुन उरलोय : नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात दाखल झालेल्या केसेसवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यानंतर पत्रकार परिषद घेत राणे यांनी आपली भूमिका मांडली.

मुंबई : तुम्ही कोणीही माझं काहीही करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रतिक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हा सर्वांना मी आतापर्यंत पुरुन उरलो आहे. शिवसेना वाढवण्यात माझा मोठा वाटा आहे. तेव्हा आताचे कोणी नव्हते. कुठे काय करत होते माहिती नाही. त्यामुळे त्यांना जे काही करायचं ते करुदे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी जनआशीर्वाद यात्रा सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज नारायण राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

काय म्हणाले राणे?
काल रत्नागिरीमधून महाड कोर्टात जाऊन पहाटे 5 वाजता आलो. आज हायकोर्टात माझ्या विरोधात ज्या केसेस दाखल करण्यात आल्या होत्या, त्याबाबत याचिका दाखल केली होती. साडेतीन वाजता सुनावणी याबाबत झाली आहे. माझ्या बाजूने हे निकाल लागले आहेत. 17 सप्टेंबर पर्यंत केस असल्यामुळे याबाबत काही बोलणार नाही. आज पत्रकारांना माहिती देण्यासाठी आलो आहे.

परवापासून यात्रा सुरू होणार : राणे
मागील काही दिवस माझा दौरा सुरू होता. जे काही माध्यमांमध्ये येत होतं याबाबत मला माहिती मिळत होती. काहीजण माझ्या चांगुलपणाचा फायदा घेत होते हे लक्षात आलं. पंतप्रधान मोदींना 7 वर्षे पूर्ण झाली होती. याबाबत ज्या योजना त्यांनी लागू केल्या होत्या ते सांगण्यासाठी ही यात्रा होती. देशातील कॅबिनेटमध्ये मला मंत्री म्हणून घेतलं. आम्हा नवीन सर्व मंत्र्यांना जनआशीर्वाद यात्रा करण्याचं सांगितलं होतं. 19 तारखेपासून मी यात्रा सुरू केली होती. कालपर्यंत सुरू होती. 2 दिवस यात्रा थांबली आहे. परवापासून यात्रा सुरू होणार.

शिवसेना नेत्यांचे शब्द दिसत नाही का? : राणे
मागील काही दिवसांत माझ्याविरोधात लढा सुरू करण्यात आला. परंतु यावेळी मला माझ्या भाजपच्या नेत्यांचं पाठबळ मिळालं. मी काय बोललो ते वाक्य मी परत बोलणार नाही. 52 वर्षात अशी पत्रकारिता पाहिली नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द उच्चारले नाहीत का? ऑगस्टला बीडीडी चाळींच्या कार्यक्रमात लाड साहेबांना ते बोलले होते महिलांवर हात टाकला तर.... मी सुद्धा असंच बोललो होतो.

माननीय पवार साहेबांनी अएवढं चांगलं बोलणाऱ्याला मुख्यमंत्री केलं : राणे
ते महाशय काय बोलले होते. सेनाभवनबाबत कोण जर अशी भाषा करत असेल तर त्याचं थोबाड फोडा. यावर गुन्हा दाखल करायला नको. योगीबाबत बोलले होते योगी आहे की ढोंगी याला चपलाने मारलं पाहिजे. काय केलं होतं त्यांनी?  अमित शाह बाबत बोलले होते की, निर्लज्जपणाने हा शब्द वापरतो असं विधानसभेच्या वेळी बोलले होते. माननीय पवार साहेब काय सज्जनपणा आहे. एवढं चांगलं बोलणाऱ्याला मुख्यमंत्री केलं.

आम्ही राष्ट्रबाबत अज्ञानपणा बाबत बोललो : राणे 
आम्ही राष्ट्रबाबत अज्ञानपणा बाबत बोललो. चिपळूणला केवळ 17 माणसं होती. तिथून पुढे 13 माणसं होती. आणि काय चालवत होते शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झाली होती. तुम्ही कोणीही माझं काही करु शकत नाही. तुम्हा सर्वांना मी पुरून उरलो आहे. ते अशब्द बोलणारे सुद्धा नव्हते. सेना वाढवण्यात माझा वाटा आहे. अनिल परबचा विडिओ व्हायरल आहे. तो आदेश देतो. माझा सवाल आहे दिशा सालीयन, पूजा चव्हाण प्रकरणाचं काय झालं? ज्यांनी हे सर्व केलं ते जोपर्यंत आत जात नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही. माझा सवाल आहे दिशा सालीयन कथित संजय राठोड प्रकरणातील मुलगी यांचं पुढं काय झालं? मला भारत देशाचा अभिमान आहे ज्याला भारताच्या स्वातंत्र्यदिनाबाबत माहिती नाही. त्यामुळे माझ्या तोंडून हे वाक्य आलं. आता जपून पावलं टाकली पाहिजेत.

महत्त्वाच्या बातम्या

सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget