एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कल्याण स्टेशन परिसरात पोलिसांचं अनधिकृत पार्किंग
कल्याणचा स्टेशन परिसर नेहमीच गर्दीनं गजबजलेला असतो. मोठी वाहतूक असलेला हा भाग आहे. मात्र याच परिसरात नेहमीच्या वाहतूक कोंडीत पोलिसच भर पाडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर अनेक ठिकाणी पोलिसांनी अनधिकृत पार्किंग उभारले आहे.
कल्याण: कल्याण स्टेशन परिसरात पोलिसांनी अनधिकृत पार्किंग उभारल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून वाहतूक पोलिसही याकडे कानाडोळा करत आहेत. ज्या ठिकाणी या गाड्या अनधिकृतपणे लावल्या जातात, ती जागा केडीएमटी बसेस उभ्या करण्यासाठी राखीव आहे. मात्र पोलिसांच्या अतिक्रमणामुळे पालिकेच्या बसेस उभ्या करायलाही जागा उरलेली नाही.
कल्याणचा स्टेशन परिसर नेहमीच गर्दीनं गजबजलेला असतो. मोठी वाहतूक असलेला हा भाग आहे. मात्र याच परिसरात नेहमीच्या वाहतूक कोंडीत पोलिसच भर पाडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर अनेक ठिकाणी पोलिसांनी अनधिकृत पार्किंग उभारले आहे.
कल्याण स्टेशनच्या बाहेर असलेल्या परिसरात बस डेपो, रेल्वे, न्यायालय, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, सत्र न्यायालय अशी महत्त्वाची सरकारी कार्यालयं आहेत. मात्र या सगळ्या कार्यालयांच्या बाहेर नजर जाईल तिथवर केवळ पोलिसांच्याच गाड्या अनधिकृतपणे पार्क केलेल्या दिसून येतात. विशेष म्हणजे याच जागी एखाद्या सर्वसामान्य वाहनचालकाने गाडी लावली तर टोईंग व्हॅनकडून तत्परतेनं त्यांची गाडी उचलून नेली जाते. मात्र बाजूच्या पोलिसांच्या गाड्यांकडे वाहतूक पोलिसांकडून अभय मिळतं. याबाबत वाहनचालकही नाराजी व्यक्त करत आहेत.
ज्या ठिकाणी या गाड्या अनधिकृतपणे लावल्या जातात, ती जागा केडीएमटी बसेस उभ्या करण्यासाठी राखीव आहे. मात्र पोलिसांच्या अतिक्रमणामुळे पालिकेच्या बसेस उभ्या करायलाही जागा उरली नाहीये. शिवाय बाजूलाच महापालिकेचं अधिकृत पार्किंग असून तिथल्या वाहनचालकांनाही या अनधिकृत पार्किंगचा मोठा त्रास होतो. मात्र या सगळ्याविरोधात उघडपणे बोलायला कुणी धजावत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement