पटकन प्रतिक्रिया देणारे गृहमंत्री फडणवीस आज दिसत नाही; गोळीबार प्रकरणी यशोमती ठाकूरांची टीका
महाराष्ट्राचा तुम्ही जर बिहार कराल, तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही, असेही यशोमती ठाकूर म्हण्ल्यात.
![पटकन प्रतिक्रिया देणारे गृहमंत्री फडणवीस आज दिसत नाही; गोळीबार प्रकरणी यशोमती ठाकूरांची टीका Ulhasnagar bjp mla Ganpat Gaikwad shoots on shinde sena leader Yashomati Thakur criticizes Devendra Fadnavis marathi news पटकन प्रतिक्रिया देणारे गृहमंत्री फडणवीस आज दिसत नाही; गोळीबार प्रकरणी यशोमती ठाकूरांची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/03/b180ce9360332d1c6bc8c758657c2fc01706944054739737_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : उल्हासनगरमधील (UlhasNagar Crime) भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात आता विरोधकांकडून सरकारवर टीका होतांना पाहायला मिळत आहे. 'महाराष्ट्राचा बिहार जर तुम्ही कराल, तर महाराष्ट्रची जनता तुम्हाला माफ करणार नाही. तर, पटकन प्रतिक्रिया देणारे गृहमंत्री फडणवीस आज दिसत नाही असे म्हणत काँग्रेस नेत्या तथा आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे.
पुढे बोलतांना यशोमती ठाकूर म्हणाल्यात की, "सर्व गुंडाराज सुरू आहे, महाराष्ट्राचा बिहार करायच्या दृष्टिकोनातून हे सर्व केल जात आहे. एकीकडे मुंबईच्या सर्व गोष्टी तुम्ही गुजरातकडे नेत असून, दुसरीकडे अशा गोष्टींना तुम्ही वाव देत आहे. या लोकांवर गुन्हे दाखल होत नाही आणि त्यांना अटक देखील केली जात नाही. हे पहिल्यांदाच असे घडत नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. आधीपण गोळीबारसारख्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रमध्ये असं कधीच झालं नाही जे आज घडलं आहे. या सर्व गोष्टींचा निषेध आहे. दुःख याचं आहे की, यांनी जी खिचडी महाराष्ट्रमध्ये चालवली आहे, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी अनबन सुरू आहे, त्याचा हे कारण आहे. गृहमंत्री तसे पटकन येतात प्रतिक्रिया देण्यासाठी, पण आज ते दिसत नाही. अशा गोष्टी सहन कशा केल्या जातात. महाराष्ट्राचा तुम्ही जर बिहार कराल, तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही, असेही ठाकूर म्हण्ल्यात.
उल्हासनगर शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला
उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणी आता शिवसैनिकांचा विरोध वाढतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे, उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस स्टेशनबाहेर आणि उल्हासनगर शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसैनिक हीललाईन पोलीस स्टेशनबाहेर जमत आहेत. तरम शिवसैनिकांचा विरोध वाढतोय त्या कारणास्तव सध्या पोलीस बंदोबस्त उल्हासनगरमध्ये सर्वत्र वाढवण्यात आलाय.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)