एक्स्प्लोर
तेजस उद्धव ठाकरे निवडणुकीच्या प्रचारात
मुंबई : ठाकरे कुटुंबाची तिसरी पिढी आता निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्याबरोबर 21 वर्षीय तेजस ठाकरे सुद्धा सध्या मुंबईत शिवसेनेच्या विविध शाखांना भेटी देत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. उद्धव यांचे थोरले पुत्र आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रीय असून ते युवासेनेचे अध्यक्षही आहेत.
दरम्यान तेजस ठाकरे काही महिन्यांपूर्वी खेकड्याच्या काही प्रजाती शोधून काढल्या होत्या. यातील एका प्रजातीला ठाकरे कुटुंबीयांचं नाव देण्यात आलं आहे. ‘गुबेरनॅटोरिआना ठाकरी’ आणि इतर चार प्रजाती तेजसने सावंतवाडीजवळ शोधल्या होत्या.
तेजस ठाकरेने शोधलेल्या खेकड्याच्या प्रजातीला ठाकरे कुटुंबाचं नाव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement