एक्स्प्लोर

Sanjay Raut : 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर 20 तारखेला काळजीपूर्वक मतदान करा : संजय राऊत

Maha Vikas Aghadi : उत्तर प्रदेशात 10 अर्भकं जळून मेली आणि हा जोकर इकडे येऊन म्हणतोय 'बटेंगे तो कटेंगे', असं सांगत खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. 

मुंबई : महाराष्ट्रात इतका पैसा ओतला जातोय पण मराठी माणूस विकला जाणार नाही. पण 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटून द्यायचे नसतील तर महाविकास आघाडीला मत द्या असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी केलं. उत्तर प्रदेशात 10 अर्भकं जळाली, पण एक जोकर महाराष्ट्रात येतोय आणि म्हणतोय, बटेंगे तो कटेंगे असं म्हणत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली. मुंबईतील महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले की, ही निवडणूक आपल्या महाराष्ट्राची आहे. हे भाजपवाले आपल्याला नेहमी सांगत आले आहेत, जर मोदी आणि शाह यांचा पराभव झाला तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील. पण 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटून द्यायचे नसतील तर महाविकास आघाडीला मत द्या. हा महाराष्ट्र मोदींच्या मित्राच्या घशात जाऊ देणार नाही. 

या राज्यात गुंडगिरी, झुंडगिरी सुरू आहे. शिवरायांचे राज्य बदनाम झाले आहे. राज्यात खोक्याची भाषा सुरू आहे. पैसा असा ओतला जातोय की जमिनीतून येतोय की आभाळातून येतोय हे कळत नाही. पण महाराष्ट्र आणि मराठी माणूस विकला जाणार नाही असं संजय राऊत म्हणाले. 

यूपीत 10 अर्भकं जळाली, हा जोकर महाराष्ट्रात प्रचार करतोय

संजय राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरे महाराष्ट्रात फिरत आहेत त्यांच्या सभेला मोठा प्रतिसाद आहे. शरद पवार, राहुल गांधी फिरत आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून मोदी, शाह फिरायचे बंद झाले आहेत. त्यात एक जोकर येतोय भगवे कपडे घालून. हा अपमान करतोय भगव्या कपड्याचा.  तिकडे 10 अर्भकं जळून मेली आणि हा आपल्या इकडे प्रचार करतोय. अरे तुझा बाप आला पाहिजे इथे बाटायला आणि कटायला. हम बटेंगे, कटेंगे नही. पण आम्ही 23 तारखेला फाडेंगे. "

एक है तो सेएफ है असं मोदी-योगी म्हणतात. पण तुम्ही इकडे येणं बंद करा, म्हणजे महाराष्ट्र सेफ आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला. 

फडणवीसांच्या डोक्यावर परिणाम

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, "फडणवीसांच्या डोक्यावर परिणाम काय झालाय काय माहीत? महाराष्टात निवडणुका आहेत, मग महाराष्ट्रावर बोला. महाराष्ट्रात निवडणुका जिंकले तर पाकिस्तान झेंडा फडकेल असं ते म्हणाले. त्याचा इथे काय संबंध? एवढीच हिंमत असेल तर पाकिस्तानमध्ये तिरंगा फडकवा. 23 तारखेला सत्ता आणा आणि 26 तारखेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार आणू."

55 वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. कारण महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी स्थापन केली. मराठी माणसाला मुंबई महाराष्ट्रातून हद्दपार करण्याच काम मोदी आणि अमित शाह यांनी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. 

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राला दोन शत्रू लाभले आहेत मोदी आणि अमित शाह. अदानी हा मोदी यांचा मुनीम आहे. धारावी अदानीच्या घशात घालून 1 लाख कोटी रुपयांचा फायदा अदानीला होणार आहे. हे सगळं मोदी, मित शाहमुळे झालं. म्हणून आमच सरकार पाडण्यात आलं. 

निवडणूक आयोग विकला गेला तरी आम्हाला विश्वास होता चंद्रचूड योग्य न्याय करतील. ते ज्यावेळी खुर्ची वर बसायचे त्यावेळी गद्दारांनी कसं चुकीच काम केलं आहे हे सांगत होते. अडीच वर्षानंतर ते निवृत्त झाले. त्यानी न्यायाला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र 20 तारखेला आपल्याला न्याय करायचा आहे असं संजय राऊत म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण! मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केलं अटक, हत्येच्या कटात सहभाग असल्याची माहिती 
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण! मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केलं अटक, हत्येच्या कटात सहभाग असल्याची माहिती 
Ganeshotsav : गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर... मुंबई-ठाण्यासह राज्यभरात दीड दिवसाच्या गणेशाचं विसर्जन
गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर... मुंबई-ठाण्यासह राज्यभरात दीड दिवसाच्या गणेशाचं विसर्जन
Chandrashekhar Bawankule : दुय्यम निबंधकाच्या तक्रारी, महसूलमंत्र्यांची अचानक भेट अन् झाडाझडती, सावनेरमध्ये प्रशासनाची धावपळ
दुय्यम निबंधकाच्या तक्रारी, महसूलमंत्र्यांची अचानक भेट अन् झाडाझडती, सावनेरमध्ये प्रशासनाची धावपळ
Mohan Bhagwat : नरेंद्र मोदी 75 व्या वर्षी राजकारणातून निवृत्त होणार? मोहन भागवतांनी स्पष्ट सांगितलं, संघाने आदेश दिला तर...
नरेंद्र मोदी 75 व्या वर्षी राजकारणातून निवृत्त होणार? मोहन भागवतांनी स्पष्ट सांगितलं, संघाने आदेश दिला तर...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण! मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केलं अटक, हत्येच्या कटात सहभाग असल्याची माहिती 
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण! मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केलं अटक, हत्येच्या कटात सहभाग असल्याची माहिती 
Ganeshotsav : गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर... मुंबई-ठाण्यासह राज्यभरात दीड दिवसाच्या गणेशाचं विसर्जन
गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर... मुंबई-ठाण्यासह राज्यभरात दीड दिवसाच्या गणेशाचं विसर्जन
Chandrashekhar Bawankule : दुय्यम निबंधकाच्या तक्रारी, महसूलमंत्र्यांची अचानक भेट अन् झाडाझडती, सावनेरमध्ये प्रशासनाची धावपळ
दुय्यम निबंधकाच्या तक्रारी, महसूलमंत्र्यांची अचानक भेट अन् झाडाझडती, सावनेरमध्ये प्रशासनाची धावपळ
Mohan Bhagwat : नरेंद्र मोदी 75 व्या वर्षी राजकारणातून निवृत्त होणार? मोहन भागवतांनी स्पष्ट सांगितलं, संघाने आदेश दिला तर...
नरेंद्र मोदी 75 व्या वर्षी राजकारणातून निवृत्त होणार? मोहन भागवतांनी स्पष्ट सांगितलं, संघाने आदेश दिला तर...
शॉकिंग! भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेऊन नवऱ्यानेच बायकोला संपवलं; हत्याकांडाने मराठवाडा हादरला
शॉकिंग! भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेऊन नवऱ्यानेच बायकोला संपवलं; हत्याकांडाने मराठवाडा हादरला
शिंदेंच्या शिवसेना आमदाराच्या कानशि‍लात लगावली, आरोपी ताब्यात; संगमनेरमधील वाद टोकाला
शिंदेंच्या शिवसेना आमदाराच्या कानशि‍लात लगावली, आरोपी ताब्यात; संगमनेरमधील वाद टोकाला
Donald Trump : ट्रम्प यांना पदावरुन हकलण्यात येणार? जाणून घ्या अमेरिकेच्या संविधानात काय लिहिलंय?
ट्रम्प यांना पदावरुन हकलण्यात येणार? जाणून घ्या अमेरिकेच्या संविधानात काय लिहिलंय?
चंद्रपुरात भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, रिक्षाचालकासह सहा जण जागीच संपले, दोन प्रवासी गंभीर जखमी
चंद्रपुरात भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, रिक्षाचालकासह सहा जण जागीच संपले, दोन प्रवासी गंभीर जखमी
Embed widget