एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेना लाचार होणार नाही : उद्धव ठाकरे
मुंबई : मंत्रिपदासाठी शिवसेना लाचार होणार नाही, असा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. जे हक्काचं आहे, ते घेणार अशी सूचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिलीय.
मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि धुळ्याचे खासदार सुभाष भामरेंची वर्णी लागणार आहे. मात्र या विस्तारात शिवसेनेचे वाट्याला काय मिळेल हे अद्यापही निश्चित झालं नाही. 'मंत्रिपदासाठी शिवसेना लाचार होणार नाही. शिवसेना स्वाभिमानी पक्ष आहे. जे हक्काचं आहे ते घेणार' अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सहभागी होणार की नाही याबद्दल शंका उपस्थित होतेय. गेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी शिवसेना खासदार अनिल देसाईंना मंत्रिपद मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं. मात्र ऐनवेळी शिवसेनेनं बहिष्कार घातला आणि देसाई दिल्ली विमानतळावरुन परतले.
गेल्या काही वर्षांपासून केंद्रात मंत्रिपदाचं स्वप्न पाहात असलेल्या आरपीआय खासदार रामदास आठवले यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात आठवलेंना मंत्रिपद मिळालं आहे. तर भाजपचे धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात सरप्राईज एण्ट्री झाली आहे. उद्या दोघेही मंत्रिपदाची शपथ घेतील.
केंद्रीय मंत्रिमंडळापाठोपाठ राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांची त्यांनी भेट घेतली.
संबंधित बातम्या :
आठवलेंचं स्वप्न पूर्ण, भामरेंची सरप्राईज एण्ट्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
ठाणे
Advertisement