एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा

येत्या सोमवारपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात नेत्यांना प्राधान्य मिळत असल्याने दोन्ही पक्षांत अंतर्गत कलह सुरु झाल्याचं बोललं जातं आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (शुक्रवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काल उशिरा रात्री ही भेट झाल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्र्य़ांनी ट्विटरवरुन दिली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्धव ठाकरेंशी विस्तृत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे.

पावसाळी अधिवेशना आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असा अंदाज व्यक्त जात होता. येत्या सोमवारपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. रविवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल आणि नवनिर्वाचित मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात नेत्यांना प्राधान्य मिळत असल्याने दोन्ही पक्षांत अंतर्गत कलह सुरु झाल्याचं बोललं जातं आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे.

त्यामुळेच भाजप-शिवसेनेत मंत्रिपदाचे दावेदार, विभागांचं वाटप आणि शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद निश्चित होत नाही तोपर्यंत विस्तारावर निर्णय होणार नाही, अशी चर्चा सुरु आहे. या सर्व कारणांमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे.

शिवसेनेत अंतर्गत कलह?

एकट्या भाजपातच नाही, तर मातोश्रीच्या आदेश मानणाऱ्या शिवसेनेतही अंतर्गत कलह सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंच्या नावाची चर्चा आहे. पण यावरुन नाराज असलेल्या आमदारांच्या एका गटाने एकनाथ शिंदेंसाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरु केल्याचं दिसतं. तसंच ग्रामीण भागात लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दाराने आलेल्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिपद देण्यात येत असल्याने शिवसेना आमदारांमध्ये असंतोष असल्याचं बोललं जातं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त
गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; कोल्हापुरात 100 दारु अड्डे उध्वस्त

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
Ramdas Athawale : सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
Embed widget