एक्स्प्लोर
तेजसला जेव्हा राजकारणात यायचं तेव्हा तो येईल: उद्धव ठाकरे
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील गुजराती नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गुजराती नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला शिवसेनेनं आहे. यानिमित्त पत्रकार परिषदेचं आयोजनही करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी जिल्हा बँकेवरील बंदीवरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली.
दरम्यान, काल उद्धव ठाकरे यांचे 21 वर्षीय चिरंजीव तेजस ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेनेच्या विविध शाखांना भेटी दिल्या होत्या. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांच्या प्रचारात तेजस ठाकरे उतरणार अशी चर्चा रंगली होती. याचविषयी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना विचारण्यात आलं.
यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी बरोबर काम करतो की नाही ते पाहण्यासाठी आला होता.' असं त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं.
'तेजस काल माझ्याबरोबर सहजच आला होता, आदित्यही सोबत आहेच. पण तेजस सध्या कॉलेजमध्ये शिकतो आहे. त्यामुळे त्याचा राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. सहजच वातावरण कसं आहे हे बघायला तो आला होता. त्याला राजकारणात यायचं असेल तेव्हा येईल. पण आता तरी तसा काही उद्देश नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी तेजस सध्यातरी राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान, तेजस ठाकरेंनी काही महिन्यांपूर्वी खेकड्याच्या काही प्रजाती शोधून काढल्या होत्या. यातील एका प्रजातीला ठाकरे कुटुंबीयांचं नाव देण्यात आलं आहे. ‘गुबेरनॅटोरिआना ठाकरी’ आणि इतर चार प्रजाती तेजसने सावंतवाडीजवळ शोधल्या होत्या.
संबंधित बातम्या
तेजस ठाकरेने शोधलेल्या खेकड्याच्या प्रजातीला ठाकरे कुटुंबाचं नाव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
रायगड
जळगाव
Advertisement