एक्स्प्लोर
नवी मुंबईतील वाशीत पादचारी पुलाचा भाग कोसळला, दोघे जखमी
संध्याकाळी वॉकिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या पुलाचा वापर करतात. मात्र रात्री 8 वाजेनंतर ही घटना घडल्याने त्यावेळी तुलनेने गर्दी कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईच्या वाशी येथे पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वाशीतील नवी मुंबई महापालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
वाशीतील मिनी सिशोर आणि सागर विहार या दोन चौपाट्यांना जोडला जाणारा पादचारी पुलाचा भाग कोसळला आहे. अचानक पुलाचा भाग कोसळल्याने येथून जाणारे दोघे जण या घटनेत जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
स्थानिक नागरिक सकाळी आणि संध्याकाळी वॉकिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या पुलाचा वापर करतात. मात्र रात्री 8 वाजेनंतर ही घटना घडल्याने त्यावेळी तुलनेने गर्दी कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement