एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आरेतील वृक्षतोडीवर वारेमाप खर्च; एक झाड तोडण्याचा खर्च तब्बल साडेतेरा हजार
आरेतील मेट्रो कारशेडसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीसाठी वारेमाप खर्च झाल्याची बाब माहिती अधिकारातून मागावलेल्या माहितीत समोर आली आहे. एक झाड तोडण्यासाठी तब्बल 13 हजार 434 रुपये खर्च करण्यात आले आहे.
![आरेतील वृक्षतोडीवर वारेमाप खर्च; एक झाड तोडण्याचा खर्च तब्बल साडेतेरा हजार two crore 70 lakh spend for Aareys tree cutting आरेतील वृक्षतोडीवर वारेमाप खर्च; एक झाड तोडण्याचा खर्च तब्बल साडेतेरा हजार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/10/07104247/Aarey-Tree-Cutting.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आरेतील मेट्रो कारशेडसाठी 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या तीन दिवसांमध्ये तब्बल दोन हजार 11 झाडे तोडण्यात आली. यासाठी तब्बल 2 कोटी 70 लाख 16 हजार 898 रुपये खर्च आला आहे. म्हणजे प्रत्येक झाड तोडण्याचा खर्च हा 13 हजार 434 रुपये इतका आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी यासंदर्भातील माहितीची एमएमआरसीएलकडे माहिती अधिकारात विचारणा केली होती. त्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरेमध्ये 4 ऑक्टोबरच्या रात्री मेट्रो कारशेडसाठी दोन हजारांहून अधिक झाडे तोडण्यात आली होती. रात्रीतून झालेल्या झाडांच्या कत्तलीवर मोठी टीकाही झाली. यावर पर्यावरणप्रेमींनी उत्स्फुर्तपणे मोठे आंदोलनही केले. मात्र, आता या वृक्षतोडीबाबत माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती पुढे आलीय. एमएमआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या तीन दिवसांमध्ये दोन हजार 11 झाडे तोडण्यात आली. यासाठी तब्बल 2 कोटी 70 लाख 16 हजार 898 रुपये खर्च आला आहे. म्हणजे प्रत्येक झाड तोडण्याचा खर्च हा 13 हजार 434 रुपये इतका आहे.
वृक्षतोडीवर वारेमाप खर्च -
तज्ञांच्या माहितीनुसार नविन लावलेले एक झाड जगवताना तीन वर्षांसाठी एक हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे एमएमआरसीएलनं झाडे तर तोडलीच. शिवाय त्यावर वारेमाप पैसाही खर्च केला, असा मुद्दा या निमित्ताने उपस्थित झाला आहे. माहिती अधिकारात एका महिन्याच्या आत उत्तर मिळणे अपेक्षित असताना दोन महिन्यांनंतर ही माहिती प्राप्त झाली. त्यामुळे, एमएमआरसीएलच्या पारदर्शकतेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माहिती देण्यात टाळाटाळ -
एमएमआरसीला हा अर्ज 15 ऑक्टोबरला प्राप्त झाला. मात्र, भंडारे यांना याचे उत्तर 9 डिसेंबरला प्राप्त झाले. 'किती झाडे तोडली याचे उत्तर देण्यासाठी डिसेंबर उजाडला,' असे भंडारे यांनी सांगितले. हे पत्रही पोस्टाने न येता हाती देण्यात आले आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत माहिती अधिकाराचे उत्तर न मिळाल्याने त्यांनी अपील केले. त्यानंतर ही प्रक्रिया पुढे नेली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या पत्रावर तारीख मात्र 11 नोव्हेंबरची दिसत आहे. डिसेंबरमध्ये हातात मिळालेल्या पत्रावर नोव्हेंबरची तारीख कशी काय असू शकते आणि पत्रावर जर 11 नोव्हेंबरची तारीख असेल तर हे उत्तर द्यायला उशीर कोणत्या कारणामुळे झाला, हे स्पष्ट होणे अपेक्षित असल्याचे मत भंडारे यांनी नोंदवले.
Aarey I आरेमध्ये अभिनेते सयाजी शिंदेंकडून 2 हजार वृक्षांची लागवड I एबीपी माझा
हेही वाचा -
ठाकरे सरकारकडून आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
Aarey Metro Car Shed | आरेतील मेट्रो कारशेडचं काम मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीनंतरही सुरुच
आरेमधील मेट्रो कारशेडचं बांधकाम सुरु ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)