एक्स्प्लोर
गणपतीची मूर्ती आणताना शॉक लागून दोघांचा जागीच मृत्यू
कल्याणः उल्हासनगरमध्ये दोन गणेश भक्तांचा बाप्पाची मूर्ती आणताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरातल्या जय माता दी मंडळाचे गणेश भक्त बाप्पांना वाजत गाजत आणत होते. यावेळी उच्च दाबाच्या विद्युत वाहिणीचा तिघांना जोरदार धक्का बसला, यात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे.
हितेश तलरेजा आणि हितेश सचदेव असं मृत पावलेल्या गणेशभक्तांचं नाव आहे. तर 44 वर्षीय जखमी सुनिल यांच्यावर मीरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगत स्थानिकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं. 3 दसरा मैदान विभागातील मनिषनगर येथे जय माता दी गणेश मंडळ आहे. मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाप्पाची उंच मूर्ती रात्री 9 च्या दरम्यान घेऊन येत होते. टॅनिंग पॉईंट येथे मूर्तीचा संपर्क उच्च दाबाच्या विद्युत वाहिणीसोबत आला. बाप्पाच्या मुर्ती जवळ उभे असलेले 15 आणि 16 वर्षांचे हितेश सचदेव, हितेश तलरेजा यांना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement