एक्स्प्लोर

अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिकच्या इतर कर्मचाऱ्यांना अटकेपासून दिलेला दिलासा तूर्तास कायम

टिआरपी घोटाळ्यात हायकोर्टातील खटल्याची पुढील सुनावणी 5 मार्चला.16 मार्चपासून हायकोर्टात या खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात होणार. खटल्यात मोठ्याप्रमाणात कागदपत्र कोर्टात सादर झाल्यानं प्रत्यक्ष सुनावणीचा निर्णय.

मुंबई : कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक वृत्त वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि या वाहिनीच्या इतर कर्मचाऱ्यांना अटकेपासून दिलेलं अंतरिम संरक्षण मुंबई उच्च न्यायालयानं 5 मार्चपर्यंत कायम ठेवलं आहे. या प्रकरणात हजारो पानी कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आल्यामुळे 16 मार्चपासून मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी घेण्यात येणार असल्याचेही शुक्रवारी स्पष्ट करण्यात आलं.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा यासाठी अर्णबसह एआरजी आऊटलेअर समुहानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती ए. ए. शिंदे आणि न्यायमूरती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, पोलिसांच्या आरोपपत्राला प्रत्युत्तर म्हणून एआरजी कंपनीने खंडपीठासमोर शुक्रवारी 3 हजार पानी प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यातील काही कागदपत्रं ही मुळ याचिकेचा भाग नव्हती, त्यामुळे नवीन कागदपत्रांवर बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशी विनंती राज्य सरकारच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी खंडपीठाला केली. सिब्बल यांचे म्हणणे मान्य करून खंडपीठाने गोस्वामी आणि वाहिनीच्या इतर कर्मचाऱ्यांना दिलेला अंतरिम संरक्षण पुढील तारखेपर्यंत कायम ठेवलं आहे.

TRP Case: रिपब्लिक वाहिनी आणि अर्णबवरील आरोप निराधार आणि बिनबुडाचे, हायकोर्टात प्रतिज्ञापत्रातून दावा

तसेच 5 मार्च रोजी फक्त अंतरिम संरक्षणावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात येणार असून मुंबई पोलिसांच्या तपासाला आव्हान देणारी आणि सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेकडे चौकशी करण्याच्या मागणीसाठी एआरजी मीडियाने दाखल केलेल्या याचिकेवर 16 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात येईल, असं स्पष्ट करत न्यायालयानं ही सुनावणी तहकूब केली.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai: एशियाटिक सोसायटी निवडणुकीत 'एशियाटिक टुमॉरो' पॅनेलचे एकहाती वर्चस्व; विनय सहस्रबुद्धे यांचा दणदणीत विजय, कुमार केतकरांच्या पॅनेलचा दारुण पराभव
मुंबईतील एशियाटिक सोसायटी निवडणुकीत 'एशियाटिक टुमॉरो' पॅनेलचे एकहाती वर्चस्व; विनय सहस्रबुद्धे यांचा दणदणीत विजय, कुमार केतकर यांच्या पॅनेलचा दारुण पराभव
Mumbai Rain : मुंबईकरांनो सावधान! क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन, IMDचा अंदाज काय?
मुंबईकरांनो सावधान! क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन, IMDचा अंदाज काय?
Maharashtra Rain Alert: मुंबई, कोकणासह राज्यभरात पावसाचं थैमान; राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा; हवामान विभागाकडून महत्वाच्या सूचना जारी, वाचा सर्व अपडेट्स
मुंबई, कोकणासह राज्यभरात पावसाचं थैमान; राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा; हवामान विभागाकडून महत्वाच्या सूचना जारी, वाचा सर्व अपडेट्स
मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
Tukaram Mundhe Pune FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
Pune News: तळेगावात रस्ता दुभंगला, पाण्याचा प्रचंड फवारा बाहेर आला, भयानक दृश्य पाहून नागरिक घाबरले, हादरवणारा व्हिडीओ समोर
तळेगावात रस्ता दुभंगला, पाण्याचा प्रचंड फवारा बाहेर आला, भयानक दृश्य पाहून नागरिक घाबरले, हादरवणारा व्हिडीओ समोर
Pune Rain Alert: पुणेकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! हवामान विभागाकडून रेड अलर्ट, लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, 24 तासांत विक्रमी नोंद
पुणेकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! हवामान विभागाकडून रेड अलर्ट, लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, 24 तासांत विक्रमी नोंद
Vyatipat Yog 2026 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
Embed widget