एक्स्प्लोर
महिला पोलिसाला फरफटत नेलं, परिवहन मंत्र्यांकडून गंभीर दखल
गेल्या दोन दिवसात एकूण 184 रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे. तर अवैध्यरित्या चालणाऱ्या 60 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
कल्याण : कल्याणमध्ये वाहतूक महिला कर्मचाऱ्याला रिक्षा चालकाने फरफटत नेल्याच्या घटनेची परिवहन विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर परिवहन विभागाने कल्याणमध्ये मुजोर रिक्षांचालकांविरोधात धडक कारवाई सुरू केलीय.
गेल्या दोन दिवसात एकूण 184 रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे. तर अवैध्यरित्या चालणाऱ्या 60 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. अशा घटना खपवून घेतल्या जाणार नसून उर्मट रिक्षा चालकावर कारवाई करत योग्य संदेश दिला जाणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं आहे.
रिक्षा चालक हे बहुतांश वेळी रिक्षा संघटनांशी संबंधित असतात. तेव्हा संघटनांशी बोलून पुढे योग्य ते पाऊल उचलणार असल्याचं रावते यांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
लायसन्स मागणाऱ्या महिला वाहतूक पोलिसाला मुजोर रिक्षाचालकाने अक्षरशः फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर आला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या प्रकारानंतर पोलिसांनी या उद्दाम रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या.
9 ऑक्टोबर 2018 रोजी संध्याकाळी ही घटना घडली. कल्याणच्या वाहतूक शाखेत काम करणाऱ्या कॉन्स्टेबल आशा गावंडे या काल संध्याकाळी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक नियंत्रणाचं काम करत होत्या. यावेळी नागेश अल्वागिरी हा रिक्षाचालक गणवेश न घालता रिक्षा चालवत असल्याचं दिसल्यानंतर त्यांनी त्याला थांबवून लायसन्स मागितलं. मात्र यावेळी थांबण्याऐवजी नागेश याने रिक्षा भरधाव वेगात कल्याण कोर्टाच्या दिशेनं दामटवली. यावेळी वाहतूक पोलीस आशा गावंडे यांनी मात्र रिक्षा धरुन ठेवत असल्याने त्या रिक्षेसोबत फरपटत गेल्या आणि मोठा गोंधळ उडाला.
ही घटना पाहून तिथे उपस्थित अनेकांनी रिक्षेच्या मागे धाव घेतली आणि गावंडे यांची सुटका केली. तर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिक्षाचालक नागेश अल्वागिरीलाही पकडून ठेवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. या घटनेनंतर पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण स्टेशन परिसरात यापूर्वीही रिक्षाचालकांच्या मुजोरीच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र तरीही रिक्षाचालकांना शिस्त लावण्यात पोलीस कमी पडत असून त्यामुळे अशाप्रकारे पोलिसांवरच हल्ले करण्यापर्यंत रिक्षाचालकांची मजल गेली आहे.CCTV : कल्याणमध्ये रिक्षाचालकाची मुजोरी, महिला वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं! https://t.co/LtD19bwtrJ pic.twitter.com/379SS9nVgn
— ABP माझा (@abpmajhatv) October 10, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement