9 मिनिटं घरातील केवळ दिवेच बंद करायचे; केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचं स्पष्टीकरण
पंतप्रधान मोदी यांनी कोरोना विरोधातील लढ्यासाठी पाच एप्रिलला संध्याकाळी नऊ वाजता घरातील दिवे बंद करण्यास सांगितले आहे. मात्र, अशाने देश अंधारात जाण्याची भीती जाणकारानी व्यक्ती केली होती. त्यावर केंद्रीय उर्जामंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 5 एप्रिलला संध्याकाळी 9 वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून 9 मिनिटे दिवे किंवा टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र, यामुळे 9 मिनिटे एकाच वेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्ती केली होती. त्यावर केवळ घरातील दिवे बंद करण्यास सांगितले आहे. बाकी रस्त्यावरील पथदिवे, घरातील इतर विद्युत उपकरणे चालूच राहतील, असं स्पष्टीकरण केंद्रीय उर्जामंत्रालयाने दिले आहे. असं केल्याने देश किंवा राज्य अंधारात जाण्याचा धोका नसल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाशी लढण्यासाठी रविवारी पाच एप्रिलला संध्याकाळी नऊ वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील दिवे विझवून बाल्कनीत येऊन मेणबत्ती, टोर्च किंवा मोबाईलचा लाईट लाववण्याचे आवाहन केलं आहे. मात्र, यामुळे अचानक फ्रिक्वेन्सी कमी जास्त झाल्याने संपूर्ण देश अंधारात जाण्याचा धोका असल्याचं जाणकारांनी सांगितलं होतं. यावर केंद्रीय उर्जा मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करताना केवळ घरातील दिवे बंद करण्यात सांगितले आहे. यावेळी रस्त्यावरील दिवे, घरातील इतर सर्व विद्युत उपकरणे, रुग्णालय, पोलीस ठाण्यासह इतर महत्वाच्या ठिकाणी दिवे चालूच राहणार आहे. त्यामुळे ग्रीडमध्ये फ्रिक्वेन्सी फेल होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
9 मिनिटं लाईट शटडाऊन, विजेसंदर्भात केंद्र सरकारचा प्लॅन तयार
9 मिनिटं लाईट शटडाऊन, विजेसंदर्भात केंद्र सरकारचा प्लॅन तयार केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी पीसीसीआयएल पॉवरग्रीड आणि लोड सांभाळणाऱ्या यंत्रणेसोबत चर्चा केली. पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (पॉस्को) ने यासंदर्भात एक प्लॅन तयार केला आहे. पाचही प्रादेशिक लोड डिस्पॅच केंद्रे आणि नॅशनल लोड डीस्पॅच सेंटर (एनएलडीसी) सह जेणेकरून ब्लॅकआउट दरम्यान मागणी अचानक कमी झाली तरीही ग्रीडची वारंवारता कायम राखली जाईल. तसेच राज्य सरकारला गरज पडल्यास वीज वेळापत्रक निश्चित करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेशचा प्लॅन तयार झाला असल्याचं कळत आहे. अचानकपणे मागणी कमी झाल्यानंतर काही युनिट्सचे ग्रीड फ्रीक्वेन्सी बंद करण्यासाठी काही उत्पादक युनिट तयार मोडमध्ये ठेवण्यास सांगितले आहे. एनटीपीसीसारख्या मध्यवर्ती सुविधादेखील ग्रीडच्या आवश्यकतेनुसार त्यांचे काही गॅस आधारित स्टेशन चालू केली जाऊ शकतात. ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2 एप्रिल2020 ची देशात सर्वाधिक वीज मागणी 125817 मेगा वॅट आहे. 2 एप्रिल 2019 च्या तुलनेत ही मागणी 20 टक्क्यांनी कमी आहे.
डॉक्टर, नर्सेससोबत गैरवर्तन कराल तर खबरदार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लाईट बंद न करता दिवे लावा - नितीन राऊत जर देशात एकाचवेळी लाईट बंद केल्यास विजेची मागणी कमी होईल. लॉकडाऊनमुळे आधीच विजेची मागणी घटल्यामुळे जनरेशन आणि पुरवठ्याचे गणित बिघडले आहे. जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केल्यास अजून परिस्थिती बिघडून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास आणि कमी झाल्यास फ्रिक्वेन्सी फेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाचा काळजीपूर्वक विचार जनतेने करावा व लाईट बंद न करता फक्त दिवे किंवा मेणबत्ती लावावी असे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.
Coronavirus | राज्यात 9 मिनिटं वीज बंद केल्याने तांत्रिक बिघाड होणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे