एक्स्प्लोर
उल्हासनगरमध्ये वृद्धाला मारहाण करणाऱ्या वाहतूक पोलिसाचं निलंबन
जव्हार लुल्ला यांना या मारहाणीत जखमही झाली होती. त्यानंतर वाहतूक शाखेने घटनेची गांभीर्याने दखल घेत वाहतूक पोलिसाचं निलंबन केलं आहे.
ठाणे : ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करणाऱ्या उल्हासनगरमधील वाहतूक पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. दुचाकी उचलून टोईंग व्हॅनमध्ये टाकल्याने गाडीमागे धावत वाहतूक पोलिसाला जाब विचारला होता, त्यानंतर वृद्ध व्यक्तीला वाहतूक पोलिसाने गाडीतून उतरुन मारहाण केली होती.
वाहतूक पोलीस बलराम पाटील आणि जव्हार लुल्ला यांच्यात झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जव्हार लुल्ला यांना या मारहाणीत जखमही झाली होती. त्यानंतर वाहतूक शाखेने घटनेची गांभीर्याने दखल घेत वाहतूक पोलिसाचं निलंबन केलं आहे.
उल्हासनगर सेक्टर 17 ची रविवारी संध्याकळची ही घटना आहे. जव्हार लुल्ला यांची नो पार्किंगमध्ये उभी असलेली दुचाकी टोईंगवाल्यांनी उचलली. त्याचा विरोध करण्यासाठी गेलेल्या जव्हार लुल्ला यांची वाहतूक पोलिसाशी शाब्दिक चकमक झाली आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं.
नो पार्किंगमधील गाडी उचलताना संबंधित दुचाकीचा मालक हजर असेल तर जागेवरच पावती फाडणं अपेक्षित आहे. मात्र दुचाकी टाकून टोईंग व्हॅन पळवण्यात आली. त्याला विरोध करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला भररस्त्यात वाहतूक पोलिसाने मारहाणही केली. याची दखल घेत या वाहतूक पोलिसाचं आता निलंबन करण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ :
गाडी मालक स्वतः उपस्थित असताना जागेवर पावती फाडण्याचा नियम आहे... दुचाकी टाकून अशी गाडी पळवणं कायद्याच्या विरोधातच आहे... त्यात मारहाण करणं म्हणजे कायद्याचं रक्षण करणाऱ्यांनीच कायदा हातात घेणं आहे. pic.twitter.com/dYkaskSKvk
— विशाल बडे (@vishalbade11) February 12, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement