एक्स्प्लोर
पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत, हायवेही जाम

मुंबई : पश्चिम रेल्वेचे विस्कळीत झालेली वाहतूक अद्याप ट्रॅकवर आलेली नाही. लोकल वाहतूक तब्बल अर्धा तास उशिरा धावत आहे. त्यामुळे त्याचा भार रस्ते वाहतुकीवरही पडला आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. सकाळी बोरीवली आणि कांदिवली दरम्यान रेल्वेच्या विद्युत पुरवठा यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यानंतर झालेला खोळंबा अद्याप सुरुच आहे . पश्चिम द्रूतगती महामार्गाची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पश्चिम द्रूतगती मार्गावरच्या जेव्हीएलआर जवळ ट्रक बंद पडल्यानं महामार्गही जाम झाला आहे.
आणखी वाचा























