टॉप्स सिक्युरीटीज मनी लाँड्रिंग प्रकरण; अमित चांदोले आणि एम. शशिधरन यांना हायकोर्टाकडून 1 लाखांचा सशर्त जामीन मंजूर
Mumbai: टॉप्स सिक्युरीटी प्रकरणात अखेर अमित चांदोले आणि एम. शशिधरन यांना हायकोर्टाकडनं दिलासा मिळला आहे. टॉप्स सिक्युरीटीजशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी या दोन्ही आरोपींना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.
Mumbai: टॉप्स सिक्युरीटी प्रकरणात अखेर अमित चांदोले आणि एम. शशिधरन यांना हायकोर्टाकडनं (Mumbai High Court) दिलासा मिळला आहे. टॉप्स सिक्युरीटीजशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी या दोन्ही आरोपींना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी आपला राखून ठेवलेला निकाल सोमवारी जाहीर केला. या दोघांना प्रत्येकी 1 लाखाचा जामीन मंजूर करत हायकोर्टानं काही अटीशर्ती घातल्या आहेत. दोन्ही आरोपींनी आपला पासपोर्ट सत्र न्यायालयात जमा करावा, विनापरवानगी देशाबाहेर जाऊ नये, तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे, आठवड्यांतून दोनवेळा तपासयंत्रणेसमोर हजेरी अनिवार्य अश्या अटी घालण्यात आल्या आहेत. मुंबई सत्र न्यायालयानं या दोन्ही आरोपींना जामीन नाकारल्याच्या निर्णयाला त्यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. आरोपींविरोधातील आरोप सिद्ध करण्यासाठी मूळ गुन्ह्यात पुरेसे पुरावे नसल्याचं पोलिसांकडून या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीनं ईसीआयआर दाखल करत प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली होती. त्यामुळे या रिपोर्टच्या आधारावर अजुनही अटकेत असलेल्या आरोपींनी अमित चांदोले आणि टॉप्स सिक्युरीटीचे माजी संचालक एम. शशिधरन यांनी आपल्या कोठडीला विरोध करत दोषमुक्तीसाठीही अर्ज सादर केला आहे. अमित चांदोले हे प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय मानले जातात. जर मूळ प्रकरणात ईओडब्ल्यूनं सादर केलेला 'सी समरी' रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टानं स्वीकारला आहे तर, आता ईडीनं दाखल करून घेतलेल्या प्रकरणाला अर्थ उरत नाही, असा या याचिकेत दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ईडीच्या प्रकरणात आणखीन न्यायालयीन कोठडी न वाढवता आपली तात्काळ सुटका करावी अशी त्यांनी मागणी हायकोर्टाकडे केली गेली होती.
काय आहे प्रकरण
साल 2014 एमएमआरडीएला 350 ते 500 सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट टॉप्स ग्रुप या कंपनीला मिळालं होतं. मात्र या सुरक्षा रक्षक कंत्राटबाबत गैरप्रकार झाला आणि त्याचा आर्थिक फायदा प्रताप सरनाईक आणि अमित चांदोले यांनी घेतला, अशी तक्रार कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्यानं केली होती. या कंत्राटात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याच्या आरोप ठेऊन मनी लॉंड्रिंग कायद्यांतर्गत टॉप्स ग्रुपच्या माजी व्यवस्थापकीय संचालक एम. शशिधरन यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. तर ईडीनं आमदार सरनाईक यांच्या घरावर तसेच कार्यालयात धाडी टाकून कुटुंबियांची चौकशी यापूर्वीच केली आहे. यात सरनाईकांचे निकटवर्तीय अमित चांदोले यांनाही ईडीनं अटक केली होती.