एक्स्प्लोर
राज ठाकरे यांची आज वसईत जाहीर सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (1 मे, मंगळवार) वसईत जाहीर सभा घेणार आहेत.

शिवसेनेने होर्डिंगवर बाळासाहेबांचे फोटो लावले आहेत आणि 'बोलतो ते करुन दाखवतो', अशी टॅग लाईन दिली आहे. पण बाळासाहेब बोलायचे ते करायचे, तो अधिकार शिवसेनेला नाही, असा घणाघात राज ठाकरेंनी केला.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून त्यातील पालघर-ठाणे जिल्हा हा पहिला टप्पा असणार आहे. याचनिमित्ताने राज ठाकरे आज (1 मे, मंगळवार) वसईत जाहीर सभा घेणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आपल्या भाषणांमधून सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे आजच्या जाहीर सभेत राज ठाकरे नेमकं कुणावर शरसंधान साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात राज ठाकरे वसई, पालघर, वाडा, विक्रमगड, भिवंडी, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, बदलापूर येथील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीला अवघा एक वर्ष शिल्लक असल्याने राज ठाकरे यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठीच हा महाराष्ट्र दौरा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 2014 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला होता. मोदी लाटेचा बराचसा फटका मनसेला बसला होता. मात्र, आता सरकारविरोधी वातावरण तयार करण्यासाठी मनसेनेही कंबर कसली आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे शिवसेनेला कडवं आव्हान देण्यासाठी मनसेनं आतापासूनच व्यूहरचना सुरु केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसे कशी कामगिरी करते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. संबंधित बातम्या : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पहिलंवहिलं ट्वीटराजसाहेबांच्या आजपासून सुरु होणाऱ्या ठाणे पालघर दौऱ्याचा कार्यक्रम खालील प्रमाणे pic.twitter.com/zuCtk33hKe
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) May 1, 2018
आणखी वाचा























