एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
4 दिवसांपासून ठप्प टिटवाळा-आसनगाव रेल्वे वाहतूक आजपासून सुरु होणार
गेल्या 4 दिवसांपासून ठप्प असलेली टिटवाळा-आसनगाव रेल्वे वाहतूक आज सुरु होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.आज शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यत रेल्वेनं ही ठप्प असलेली वाहतूक सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे.
कल्याण : गेल्या 4 दिवसांपासून ठप्प असलेली टिटवाळा-आसनगाव रेल्वे वाहतूक आज सुरु होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.आज शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यत रेल्वेनं ही ठप्प असलेली वाहतूक सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे.
नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर गेल्या 4 दिवसांपासून नाशिकहून मुंबईच्या दिशेनं रेल्वेसेवा ठप्प झाली होती. नाशिकवरुन सुटणाऱ्या 30 पेक्षा जास्त गाड्या रद्द करण्यात आल्या. मात्र कामाची गती पाहता रेल्वे ट्रॅक आजही सुरळीत होण्याची चिन्हं कमी आहेत. दरम्यान अपघातानंतर दुरांतोचे सर्व डबे हटवण्यात आले. तसंच पावसामुळे बिघाड झालेल्या 35 लोकलही आज पुन्हा मार्गावर आल्या आहेत.
नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरुन अपघात झाला होता. कल्याणमध्ये आसनगाव आणि वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. एक्स्प्रेसचं इंजिन रुळावरुन घसरुन उलट पडलं, तर एक्स्प्रेसचे डबे वीस फूट अंतरावरील टेकडीवर जाऊन आदळले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement