एक्स्प्लोर

प्लॅटफॉर्मवरुन मोबाईल खेचला, रुळावर पडून लोकलमधील प्रवाशाचा मृत्यू

ठाण्याजवळच्या कळवा स्टेशनवर एका चोरट्यानं धावत्या लोकलमधून दारावर उभ्या असणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल खेचला.

मुंबई: मुंबईकरांचा जीव किती स्वस्त आहे, याचं पुन्हा एक संतापजनक उदाहरण समोर आलं आहे. स्टंटबाज नराधमांमुळे अनेकांचे जीव गेले आहेतच. त्यात आता प्लॅटफॉर्मवर उभं राहून, लोकलमधील प्रवाशांचे मोबाईल खेचणाऱ्यांमुळेही जीव जात आहेत. ठाण्याजवळच्या कळवा स्टेशनवर एका चोरट्यानं धावत्या लोकलमधून दारावर उभ्या असणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल खेचला.  आपल्या मेहनतीचा मोबाईल चोरीला जाऊ नये, म्हणून प्रवाशानेही धावत्या लोकलमधूनच फलाटाच्या दिशेनं उडी मारली.  मात्र तोपर्यंत फलाट संपला होता. त्यामुळे तो प्रवासी रुळावर पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. कळव्यामध्ये 19 ऑगस्ट रोजी रात्रीच्या 12:53 वाजता ही घटना घडली. रात्रीच्या 12.53 मिनीटाच्या कल्याणकडे जाणाऱ्या लोकल रेल्वेत हा प्रकार घडला. कळवा स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील हा प्रकार आहे. एका मोबाईलसाठी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर चोरटे लोकांचे जीव घेत असताना, रेल्वे पोलीस झोपा काढतायत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कुणाच्या मेहेरबानीनं चोरट्यांची हिंमत लोकांचा जीव घेण्यापर्यंत जाते, असाही संतापजनक प्रश्न आता विचारला जातोय. 19 ऑगस्टला घडलेल्या या घटनेनंतर अजूनही चोरटा आणि मृत प्रवासी कोण होते यांची माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका मुलाने धावत्या लोकलमधून प्रवाशाचा मोबाईल हिसकावल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. ट्रेन सुरु झाल्यावर ती वेग पकडू लागते, तसा काळ्या टी-शर्टमधील तरुणाने दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशाचा मोबईल खेचला. त्यानंतर त्या प्रवाशाने लगेच ट्रेनमधून उडी मारल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मोबाईल चोरांचे प्रमाण अधिक 2017 या पूर्ण वर्षात 18 हजार मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. मोबाईल चोरीचे 100 गुन्हे रोज दाखल होतात अशी माहिती दोन महिन्यापूर्वी GRP नी दिली होती. जे प्रवासी त्यांचा मोबाईल मिळण्याची आशाच सोडून देतात ते पोलिसात तक्रार द्यायला येत नाहीत. पोलिसात तक्रार न देणाऱ्या प्रवाशांचेही प्रमाण बरेच आहे असेही त्यांनी म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2026 | रविवार
CJP : दिल्लीनंतर मुंबईतील आंदोलकांची धरपडक, रस्त्यावरून फिरणाऱ्यांनाही ताब्यात घेतलं; दंगल घडवण्याचा पोलिसांचा डाव, मनसेचा आरोप
दिल्लीनंतर मुंबईतील आंदोलकांची धरपडक, रस्त्यावरून फिरणाऱ्यांनाही ताब्यात घेतलं; दंगल घडवण्याचा पोलिसांचा डाव, मनसेचा आरोप
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतही आंदोलनाची हाक; तर कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत नागपुरातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतही आंदोलनाची हाक; तर कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत नागपुरातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Embed widget