एक्स्प्लोर
मुंबईत येत्या 24 तासात मुसळधार- हवामान विभाग

मुंबईः मुंबईसह सर्वच भागात येत्या 24 तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. विकेन्डपासून मुंबईत सुरू झालेला संततधार पाऊस मंगळवार उजाडला तरी कायम आहे. सकाळपासूनच मुंबईतल्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे.
दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कायम असून दादर, माटुंगा, लालबाग, प्रभादेवी, वरळी, लोअर परेलमध्ये पाऊस कोसळतच आहे. मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. अंधेरी कुर्ला रोडवर मरोळनाका परिसरात पाणी साचल्यानं वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती.
पावसामुळे ट्रॅफिक जाम
पश्चिम द्रुतगती मार्ग, सायन सर्कल ते घाटकोपर दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. सर्वच रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांनी वाहनांची गति मंदावली होती. त्यामुळे मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याबरोबरच ठिकठिकाणी साचलेला ट्राफिक जाम ही मुंबईच्या पावसाची नवी ओळख दिसून येते आहे. दरम्यान पुढील 24 तासांत मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे मुंबईकरांचे डोळे येत्या 24 तासांकडे लागले आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
पुणे
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















