एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरपंच आणि नगराध्यक्षापाठोपाठ आता नगरपंचायत अध्यक्षही थेट जनतेतून
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यातील महत्त्वाचा म्हणजे सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीनंतर नगरपंचायत अध्यक्षाचीही निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात मुंबईतील दोन मेट्रो प्रकल्पांना मान्यता दिली गेली. त्याचबरोबर सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीनंतर नगरपंचायत अध्यक्षाचीही निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती अधिनियम -1965 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
राज्यात एकूण 4 नगरपंचायती आहेत. तर 222 नगर परिषद आहेत.
नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडीच्या निर्णयामुळे भाजपला मोठा फायदा झाला होता. त्यामुळे आता नगर पंचायती अध्यक्ष ही थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
मुंबई मेट्रो- 5 आणि 6 ला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement